जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / भारतात दिली जाणार रशियन कोरोना लस; Sputnik V ला हिरवा कंदील

भारतात दिली जाणार रशियन कोरोना लस; Sputnik V ला हिरवा कंदील

लशीकरणात 30 कोटी जनतेला प्राधान्य दिलं जाईल. यामध्ये एक कोटी आरोग्य कर्मचारी, दोन कोटी फ्रंटलाइन वर्कर्स आणि इतर 27 कोटींमध्ये 50 पेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती आणि इतर आजार असलेल्या व्यक्तींचा समावेश असेल.

लशीकरणात 30 कोटी जनतेला प्राधान्य दिलं जाईल. यामध्ये एक कोटी आरोग्य कर्मचारी, दोन कोटी फ्रंटलाइन वर्कर्स आणि इतर 27 कोटींमध्ये 50 पेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती आणि इतर आजार असलेल्या व्यक्तींचा समावेश असेल.

अखेर रशियन कोरोना लस Sputnik V चा भारतातील मार्ग मोकळा झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 12 एप्रिल : भारतात आणखी एका कोरोना लशीचा (Corona vaccine) मार्ग मोकळा झाला आहे. रशियन कोरोना लशीला (Russian corona vaccine) भारतात हिरवा कंदील मिळाला आहे. रशियाच्या स्पुतनिक V  (Sputnik V)  कोरोना लशीला भारतात परवानगी मिळाली (Russian corona vaccine Sputnik V approved in india) आहे. या लशीच्या आपात्कालीन वापरला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. भारतात हैदराबादमधील फार्मा कंपनी डॉ.रेड्डीज लॅबने रशियन डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंडासोबत स्पुतनिक व्ही लस भारतात तयार करण्यासाठी करार केला आहे. या लशीला भारतात आपात्कालीन वापरासाठी परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली होती.

जाहिरात

1 एप्रिलला रशियाच्या कोरोना लशीला परवानगी नाकारण्यात आली होती.  या लशीबाबत आणखी माहिती देण्याची मागणी भारतीय औषध महानियंत्रक मंडळाच्या तज्ज्ञ समितीने डॉ. रेड्डीज लॅबकडे केली होती. आता तज्ज्ञ समितीने या लशीच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिली आहे. ही समिती आता भारतीय औषध महानियंत्रक मंडळाला (DCGI) आपला निर्णय सांगणार त्यानंतर डीसीजीआय आरोग्य मंत्रालयाकडे परवानगी मागेल आणि त्यानंतर ही लस भारतात दिली जाईल. हे वाचा -  कोरोना लसीचे 2 डोस घेऊनही रुग्णांचा मृत्यू, न्यायालयानं व्यक्त केली चिंता ही लस Coronavirus विरोधात 91.6 टक्के प्रभावी असल्याची नोंद ऑगस्टमध्ये करण्यात आली आहे. रशियाने सर्वात प्रथम या लशीला मंजुरी दिली होती. त्यानंतर सप्टेंबर महिन्यापासून  ही लस नागरिकांना देण्यास सुरुवात झाली. या लशीचे दोन डोस घ्यावे लागतात. पहिला डोस घेतल्यानंतर साधारण 21 दिवसांनी दुसरा डोस घ्यावा लागतो. त्यानंतर 28 ते 42 व्या दिवसांनंतर शरीरात रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास सुरुवात होते. भारतात आतापर्यंत या लसीच्या 1 हजार 500 जणांवर चाचण्या झाल्या आहेत. हे वाचा -  सर्वोच्च न्यायालयातील 50 टक्के स्टाफ कोरोनाबाधित, ऑनलाईन होणार सुनावणी? भारतात सध्या ऑक्सफोर्ड आणि अॅस्ट्राझेनेकाच्या मदतीने तयार करण्यात आलेली पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि हैदराबादमधील भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस दिली जात आहे. भारतात 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना लस दिली गेली. त्यानंतर 60 वर्षाहून अधिक वय असलेले आणि 45 वर्षे वय असून गंभीर आजारांनी त्रस्त नागरिकांना लस देण्यास मंजुरी दिली गेली. आता 1 एप्रिलपासून 45 वर्षाहून अधिक वय असलेल्यांना लस दिली जात आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी भारताकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात