सर्वोच्च न्यायालयातील 50 टक्के स्टाफ कोरोनाबाधित, न्यायाधीश करणार Work From Home?

सर्वोच्च न्यायालयातील 50 टक्के स्टाफ कोरोनाबाधित, न्यायाधीश करणार Work From Home?

सर्वोच्च न्यायालयातील 50 टक्के स्टाफला कोरोनाची लागण (50 Percent Staff of Supreme Court Testing Corona Positive) झाली असल्याची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर आता इथून पुढच्या सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंच्या (Video Conferencing) माध्यमातून घरुनच केली जाणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 12 एप्रिल: देशात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. अशात आता याची झळ सर्वोच्च न्यायालयालाही बसली आहे. सर्वोच्च न्यायालयातील 50 टक्के स्टाफला कोरोनाची लागण (50 Percent Staff of Supreme Court Testing Corona Positive) झाली असल्याची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर आता इथून पुढच्या सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंच्या (Video Conferencing) माध्यमातून घरुनच केली जाणार आहे. सूत्रांच्या हवाल्याने 'एनडीटीव्ही'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

न्यायालयाचा संपूर्ण परिसर (Court Premise) आणि कोर्ट रुम सध्या सॅनिटाइज केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्व ठरलेल्या प्रकरणांवरील सुनावणी एक तास उशिरानं होणार आहे. एका न्यायाधीशांनी एनडीटीव्हीसोबत बोलताना सांगितलं की, "माझ्या बर्‍याच कर्मचार्‍यांना आणि लिपिकांनी कोरोनाची लागण झाली आहे." काही न्यायाधीशांना यापूर्वीच कोरोनाची लागण झाली होती, मात्र आता ते बरे झाले आहेत.

कोरोनाचा (Coronavirus) प्रसार मागच्या आठवड्यात प्रचंड वेगानं झाला आहे. तर, रविवारी नोंद झालेल्या नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येनं (Corona Update) आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, देशात रविवारी एका दिवसात 1,69,899 नवीन कोरोना रुग्णांची नोंद (Corona Cases in India) झाली आहे. ही आतापर्यंतची एका दिवसात आढळून आलेली सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. तर, देशात रविवारी 904 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील स्थिती भयंकर; बेडची कमतरता, रुग्णांना खुर्चीवर दिला जातोय ऑक्सिजन

कोरोना ट्रॅक कोविड - 19 इंडियाच्या आकडेवारीनुसार, 5 एप्रिलच्या सकाळपर्यंत 24 तासात देशात 477 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. रविवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात हा आकडा 838 वर पोहोचला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात दररोज जितके रुग्ण आढळत आहेत, त्यातील 1.27 टक्के रुग्णांचा मृत्यू होत आहे. पाच एप्रिलला मृत्यूदर 1.31 इतका होता.

Published by: Kiran Pharate
First published: April 12, 2021, 10:17 AM IST

ताज्या बातम्या