Home /News /coronavirus-latest-news /

Corona लसीचे 2 डोस घेऊनही रुग्णांचा मृत्यू, न्यायालयानं चिंता व्यक्त करत गुजरात सरकारला फटकारलं

Corona लसीचे 2 डोस घेऊनही रुग्णांचा मृत्यू, न्यायालयानं चिंता व्यक्त करत गुजरात सरकारला फटकारलं

उच्च न्यायालयात (High Court) आज कोरोना (Coronavirus) स्थितीबाबत सुनावणी होत आहे. यावेळी न्यायालयानं कोरोना लसीचे 2 डोस घेऊनही रुग्णांचा मृत्यू झाल्याचं सांगत चिंता व्यक्त केली आहे.

    अहमदाबाद 12 एप्रिल: गुजरात उच्च न्यायालयात (Gujarat High Court) आज कोरोना (Coronavirus) स्थितीबाबत सुनावणी होत आहे. गुजरात सरकारकडून वकील कमल त्रिवेदी आपली बाजू मांडत आहेत. ही सुनावणी न्यायाधीश विक्रम नाथ आणि भार्गव कारिया यांच्या खंडपीठांतर्गत केली जात आहे. गुजरातचे मुख्य सचिव अनिल मुकीम, आरोग्य विभागाचे गृह सचिव जयप्रकराश शिवहरे या सुनावणीमध्ये ऑनलाईन सहभाग घेत आहेत. सुनावणीदरम्यान न्यायालयानं म्हटलं, कि राज्यात अजूनही अशी अनेक ठिकाणं आहेत, जिथे कोरोना टेस्ट होत नाहीत. लवकराच लवकर तपासणी करता येईल, यासाठी काहीतरी पाऊलं उचला. न्यायालयानं पुढे म्हटलं कि सरकार म्हणत आहे, की स्थिती ठीक आहे, मात्र प्रत्यक्षात स्थिती भयंकर आहे. सरन्यायाधीश म्हणाले, कि मला अशी माहिती मिळाली आहे, कि रुग्णालय रुग्णांना दाखल करुन घेण्यास नकार देत आहेत. इतकंच नाही तर ते पुढे म्हणाले, की लसीचे दोन डोस घेऊनही रुग्णांचा मृत्यू होत आहे. सर्वोच्च न्यायालयातील 50 टक्के स्टाफ कोरोनाबाधित, ऑनलाईन होणार सुनावणी? पुढे ते म्हणाले, कि ऑफिसमधील स्टाफची संख्या पन्नास टक्के करा. नाईट कर्फ्यूदेखील योग्य पद्धतीनं पाळला जात नाही. यात सूट दिली जात आहे. न्यायालयानं विचारलं, की निवडणूकीच्या वेळी केंद्रावर जसं नियोजन केलं जातं, तसंच आताही का केलं जाऊ शकत नाही. न्यायालयानं म्हटलं कि जे लोक कोरोना नियमांचं पालन करत नाहीत त्यांना कोविड सेंटरमध्ये पाठवा. सरकारच्या उपाययोजनांवर नाराज असलेल्या न्यायालयानं यात सुधारणा करण्याचाही सल्ला दिला. वकील त्रिवेदी म्हणाले, की राज्यात 71021 बेड उपलब्ध आहेत. तर, 1127 कोविड रुग्णालयं सुरू आहेत. त्रिवेदी म्हणाले, की मागील वेळी लॉकडाऊनचा आदेश केंद्र सरकारनं दिला होता. मात्र, यावेळी लॉकडाऊन अशक्य आहे. कारण, यामुळे लोकांना खूप नुकसान सहन करावं लागतं. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली रोज कोर कमेटीचा बैठक होते.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Corona, Corona vaccination, Corona vaccine, Gujarat cm, High Court

    पुढील बातम्या