मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

बापरे! रेस्टॉरंट, जिम, प्रार्थनास्थळं? नव्या संशोधनानुसार ‘या’ ठिकाणी Covid-19 संसर्गाची दाट शक्यता

बापरे! रेस्टॉरंट, जिम, प्रार्थनास्थळं? नव्या संशोधनानुसार ‘या’ ठिकाणी Covid-19 संसर्गाची दाट शक्यता

नेचर मासिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या नव्या अभ्यासात तुम्ही अशा कोणत्या ठिकाणी गेलात तर तुम्हाला कोविडची लागण होण्याचा धोका अधिक आहे. अशा ठिकाणांची यादी दिली आहे.

नेचर मासिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या नव्या अभ्यासात तुम्ही अशा कोणत्या ठिकाणी गेलात तर तुम्हाला कोविडची लागण होण्याचा धोका अधिक आहे. अशा ठिकाणांची यादी दिली आहे.

नेचर मासिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या नव्या अभ्यासात तुम्ही अशा कोणत्या ठिकाणी गेलात तर तुम्हाला कोविडची लागण होण्याचा धोका अधिक आहे. अशा ठिकाणांची यादी दिली आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

 नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर : कोरोना महामारीला (Coronavirus) 10 महिने झालेत आणि आपण मास्क लावणं, सोशल डिस्टन्सिंग, हात धुणं याला सरावलो आहोत. आता आपण घराबाहेर पडतोय, बाहेर खायलाही सुरुवात केली आहे.  पण कोरोनाच्या केसेस वाढतच आहेत. लॉकडाउनमध्ये (Lockdown) सूट मिळाल्यानंतर महत्त्वाच्या कामांसाठीच बाहेर पडणारे लोक आता अधिक प्रमाणात घराबाहेर पडत आहेत.

नेचर मासिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या नव्या अभ्यासात तुम्ही अशा कोणत्या ठिकाणी गेलात तर तुम्हाला कोविडची लागण होण्याचा धोका अधिक आहे. अशा ठिकाणांची यादी दिली आहे. मोठ्या शहरांतल्या छोट्या-छोट्या ठिकाणी माणसं वारंवार जातात अशा ठिकाणी संसर्गाचा धोका मोठा आहे. रेस्टॉरंट, जिम, कॅफे, हॉटेल या ठिकाणी बसण्याची मर्यादा कमी केल्यास संसर्ग खूप कमी होईल असं या अभ्यासात म्हटलंय. स्टॅनफोर्ड विद्यापीठातील कॉम्प्युटर सायन्स विषयाचे असोसिएट प्रोफेसर आणि या अभ्यासातील संशोधक ज्युर लेस्कोव्हेक यांनी सीएनएनला सांगितलं, ‘आमच्या मॉडेल अभ्यासानुसार गर्दीच्या जागी 20 टक्के बंधनं वाढवली तर संसर्ग 80 टक्क्यांनी कमी होऊ शकतो. पण असं केलं तरीही नेहमी जेव्हा ही हॉटेल पूर्ण क्षमतेने सुरू असतात त्याच्याशी तुलना केली तरीही त्यात फक्त 40 टक्के ग्राहकांनाच अटकाव होते. म्हणजे नेहमच्या तुलनेत 60 टक्के लोक येताततच. ’

हे ही वाचा-मास्क धुवून उन्हात ठेवला तर 99.99 टक्के कोरोनाचे विषाणू नष्ट होतात?

अमेरिकेतील 10 मोठ्या मेट्रोपोलिटन भागांतील कोविडच्या संभाव्य संसर्गाचा अभ्यास करण्यासाठी या संशोधकांनी मोबाइल फोनच्या लोकेशनचा डाटा वापरला. रेस्टॉरंट, कॅफे, किराणं दुकानं, जिम, हॉटेल, दवाखाने, प्रार्थनास्थळं या ठिकाणी जाणाऱ्या लोकांचा आणि कोरोना संसर्गाचा अभ्यास त्यांनी केला. ‘ मेट्रो शहरांतील पूर्ण सुरू झालेली रेस्टॉरंट, जिम, हॉटेल, कॅफे, प्रार्थनास्थळं, मर्यादित सेवा देणारी रेस्टॉरंट पूर्ण क्षमतेनी सुरू झाली तर या सर्व ठिकाणी संसर्ग वाढण्याची शक्यता आहे,’ असं अभ्यासात म्हटलं आहे.

हे ही वाचा-कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांनी ओलांडला 16 लाखांचा टप्पा, गर्दी वाढल्याने चिंता

‘आमच्या मॉडेलनुसार किराणा दुकानात गरिब माणूस एकदा गेला तर ते त्याला श्रीमंत माणसाच्या तुलनेत दुप्पट धोकादायक आहे, ’ असही ज्युर यांनी सांगितलं. झोपडपट्टीतील दुकानं किंवा घरांमध्ये जागा कमी उपलब्ध आहे आणि गर्दी जास्त आहे त्यामुळे ही ठिकाणं अधिक धोकादायक ठरू शकतात असंही या अभ्यासातलं निरीक्षण आहे. तरीही, या अभ्यासातही त्रुटी आहेत. हा सर्वसमावेशक अभ्यास नाही. याचं मॉडेल सिम्युलेशन आहे आणि हा डाटाही फक्त एकाच देशातल्या 10 मेट्रोसिटींमधला आहे. तुरुंग, सोसायट्या, नर्सरी, नर्सिंग होम, शाळा, ऑफिसं या संसर्गाची शक्यता असलेल्या महत्त्वाच्या ठिकाणांचा अभ्यास यात करण्यात आलेला नाही

First published:

Tags: Coronavirus