मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

COVID-19वर मात करणाऱ्या रुग्णांनी ओलांडला 16 लाखांचा टप्पा, दिवाळीच्या गर्दीने चिंता वाढवली

COVID-19वर मात करणाऱ्या रुग्णांनी ओलांडला 16 लाखांचा टप्पा, दिवाळीच्या गर्दीने चिंता वाढवली

राज्यात कोरोनाचा आलेख सध्या सध्या घसरणीला लागला आहे. मात्र पुढच्या काही महिन्यांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

राज्यात कोरोनाचा आलेख सध्या सध्या घसरणीला लागला आहे. मात्र पुढच्या काही महिन्यांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केल्याने नागरिकांना सुरक्षेच्या सर्व नियमांचं पालन करावं असं आवाहन सरकारने केलं आहे.

  • Published by:  Ajay Kautikwar

मुंबई 12 नोव्हेंबर: राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येने विक्रम केला आहे. राज्यात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या ही 16,05,064 एवढी झाली आहे. गुरूवारी दिवसभरात 7,809 रुग्णांनी कोरोनावर मात केली. तर 4,496 नवीन रुग्ण आढळून आलेत. 122 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू दर हा 2.63 एवढा झाला आहे. तर रुग्णांची एकूण संख्या ही        17,36,329वर गेली आहे. Recovery rate हा 2.63वर गेला आहे. गेल्या महिनाभरापासून रुग्णांचा आलेख कमी होत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून दिवाळीसाठी खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये गर्दी उसळली आहे. त्यामुळे राज्य सरकारची चिंता वाढवली असून गर्दीला अटकाव कसा करायचा असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे.

राज्यात कोरोना संसर्गाचा (Coronavirus) आलेख घसरतो आहे. ही घसरण गेल्या महिनाभरापासून कायम आहे. नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढलेली आहे. पण गाफील राहू नका, कोरोनाची (Covid-19) दुसरी लाट येणार हे स्पष्ट आहे, असे संकेत राज्याचे औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे (Drug Administration Minister Rajendra Shingane) यांनी सांगितलं आहे.

राजेंद्र शिंगणे यांनी सांगितलं की, आम्ही या सर्व गोष्टींचा मुकाबला करण्यासाठी तयार आहोत. दवाखाने सज्जता, वैद्यकीय सुविधा आणि औषधांचा साठा मुबलक आहे. तरी देखील या लाटेची तीव्रता किती आहे? कोरोनाच्या लक्षणांमध्ये काही बदल झाला आहे का? या सर्व बाबींवर आरोग्य विभागाचं बारीक लक्ष आहे. तरी नागरिकांनीही काळजी घ्यावी असं आवाहन राजेंद्र शिंगणे यांनी केलं आहे.

First published:

Tags: Coronavirus