मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /Corona Vaccine विक्रीतून 'हे' 9 जण बनले अब्जाधीश; सर्व गरीब देशांतील जनतेला लसीकरण करण्याइतकी संपत्ती

Corona Vaccine विक्रीतून 'हे' 9 जण बनले अब्जाधीश; सर्व गरीब देशांतील जनतेला लसीकरण करण्याइतकी संपत्ती

कोरोना विषाणूचा (Corona virus) फैलाव रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या लसीच्या (Corona Vaccine) विक्रीतून झालेल्या नफ्यानं जगभरात तब्बल नऊ जण नवे अब्जाधीश झाले आहेत.

कोरोना विषाणूचा (Corona virus) फैलाव रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या लसीच्या (Corona Vaccine) विक्रीतून झालेल्या नफ्यानं जगभरात तब्बल नऊ जण नवे अब्जाधीश झाले आहेत.

कोरोना विषाणूचा (Corona virus) फैलाव रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या लसीच्या (Corona Vaccine) विक्रीतून झालेल्या नफ्यानं जगभरात तब्बल नऊ जण नवे अब्जाधीश झाले आहेत.

नवी दिल्ली, 20 मे : कोरोना विषाणूचा (Coronavirus) फैलाव रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या लसीच्या (Corona Vaccine) विक्रीतून झालेल्या नफ्यानं जगभरात तब्बल 9 जण नवे अब्जाधीश झाले आहेत. लसीवरील पेटंट काढून त्याच्या उत्पादनावरील बंधने दूर करण्याची मागणी करणाऱ्या 'ग्रुप पीपल्स व्हॅक्सीन अलायन्सनं' हा दावा केला आहे. लसी उत्पादक तंत्रज्ञानावरील मोठ्या फार्मा कंपन्यांची मक्तेदारी संपली पाहिजे, अशी या संघटनेची मागणी आहे. हा दावा फोर्ब्स रिच लिस्टमधील आकडेवारीवर आधारित असल्याचं या गटाचं म्हणणं आहे. अनेक संघटना आणि कार्यकर्ते यांचा समावेश असलेली ही संघटना आहे.

इटी नाऊच्या वृत्तानुसार, या नऊ अब्जाधीशांची संपत्ती 19.3 अब्ज डॉलर्स आहे. इतक्या पैशांमध्ये गरीब देशांतील संपूर्ण लोकसंख्येचे एकापेक्षा जास्त वेळा लसीकरण करणे शक्य आहे. संघटनेतील चॅरिटी ऑक्सफॅमशी संबंधित एन्ना मॅरियट म्हणाल्या की, लसीवरील मक्तेदारीमुळं फार्मा कंपन्या मोठ्या प्रमाणात नफा कमावतात. यामुळंच या नव्या नऊ अब्जाधीशांचा उदय झाला आहे.

हे वाचा‘जे कोरोना लसीकरण सेंटरवर येऊ शकत नाही त्यांचं काय?’, मुंबई हायकोर्टाचे BMC, केंद्रावर ताशेरे

मॉडर्नाचे प्रमुख स्टीफन बेन्सल सर्वांत वरती

नवीन अब्जाधीशांच्या यादीत मॉडर्नाचे प्रमुख स्टीफन बेन्सल अव्वल स्थानी आहेत. त्यानंतर फायझर लस उत्पादक बायोएन्टेकचे प्रमुख उगर साहीन हे आहेत. याखेरीज कॅन्सीनो बायोलॉजिक्स या चिनी कंपनीचे तीन सहसंस्थापकदेखील नवीन अब्जाधीशांच्या यादीत आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिकेसारखे देश सतत लसीवरून पेटंट संरक्षण हटविण्याची मागणी करत आहेत. यादरम्यानच 'पीपल्स व्हॅक्सीन अलायन्स'ने हे विधान केलं आहे.

हे वाचाCyclone Tauktae: मुंबईच्या समुद्रात मृत्यूतांडव सुरूच, आणखी 4 मृतदेह सापडले, मृतांची संख्या 41 वर

लसींवरील पेटंट हटविल्यामुळं विकसनशील देशांमध्ये देखील लस उत्पादन वाढविण्यास आणि जगाला साथीच्या रोगातून लवकरात-लवकर मुक्त होण्यास मदत होईल, असे या संघटनेचं आणि गरीब देशांचंही म्हणणं आहे. अमेरिकेसारख्या देशांनी आणि पोप फ्रान्सिस यांच्यासारख्या महत्त्वाच्या व्यक्तींनीही पेटंट हटविण्याच्या मागणीला पाठिंबा दर्शविला आहे.

First published:
top videos

    Tags: Corona vaccine, Corona virus in india, Coronavirus