नवी दिल्ली 20 मे : सध्या देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा (Second Wave of Coronavirus) सामना करत आहे. अशातच शास्त्रज्ञांनी तिसऱ्या लाटेबाबतही (Third Wave of Corona) इशारा दिला आहे. भारत सरकारच्या विज्ञान मंत्रालयांतर्गत विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने स्थापन केलेल्या शास्त्रज्ञांच्या तीन सदस्यांच्या पॅनलने कोरोनाची दुसरी लाट कधी संपणार आणि तिसरी लाट भारतात कधी येईल, याबाबत अंदाज व्यक्त केला आहे. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, भारतात कोरोनाची दुसरी लाट जुलैपर्यंत ओसरण्याची शक्यता आहे. तर, जवळपास सहा ते आठ महिन्यांनी कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे.
भारत सरकारच्या विज्ञान मंत्रालयांतर्गत विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने स्थापन केलेल्या वैज्ञानिकांच्या तीन सदस्यांच्या पॅनेलने हे अंदाज बांधले आहेत. SUTRA मॉडेलचा वापर करुन शास्त्रज्ञांनी अशी भविष्यवाणी केली आहे , की मे महिन्याच्या शेवटापर्यंत दररोज जवळपास 1.5 लाख कोरोना रुग्ण आढळतील. तर, जूनपर्यंत ही संख्या घटून 20,000 जाईल.
या राज्यांमध्ये कोरोना उच्चांकावर -
पॅनलमधील एक सदस्य आणि आयआयटी कानपूरचे प्रोफेसर मनिंद्र अग्रवाल यांनी सांगितलं, की महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, झारखंड, राजस्थान, केरळ, सिक्कीम, उत्तराखंड, गुजरात, हरियाणा, दिल्ली आणि गोवासारख्या राज्यांनी अधिक रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला आहे.
या मॉडेलनुसार, तमिळनाडूमध्ये 29 ते 31 मेदरम्यान कोरोना उच्चांक गाठेल. तर, पुद्दपचेरीमध्ये 19-20 मे रोजी रुग्णसंख्येचा उच्चांक पाहायला मिळेल. आसाममध्ये 20-21 मे, मेघालय 30 मे, त्रिपुरा 26-27 मे, हिमाचल प्रदेश 24 मे तर पंजाबमध्ये 22 मेपर्यंत कोरोना उच्चांक गाठेल, अशी शक्यता आहे.
मॉडेलनुसार, सहा ते आठ महिन्यांमध्ये कोरोनाची तिसरी लाट येईल, असा अंदाज आहे. प्रोफेसर अग्रवाल म्हणाले, की यात अधिक लोक प्रभावित होणार नाहीत कारण तोपर्यंत बहुतेकांना लस दिली गेली असेल. त्यांनी सांगितलं, की कमीत कमी ऑक्टोबर 2021 पर्यंत तिसरी लाट येणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.