मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

नोकरी करता करता सोप्या पद्धतीनं पैसे कमवा; 'हे' गुंतवणुकीचे पर्यात ठरतील फायदेशीर

नोकरी करता करता सोप्या पद्धतीनं पैसे कमवा; 'हे' गुंतवणुकीचे पर्यात ठरतील फायदेशीर

पगार कमी असो वा जास्त थोडी थोडी गुंतवणूक करणं अत्यावश्यक आहे. ही गुंतवणूक करताना दुहेरी लाभ जिथं मिळतो तिथं ती करणं महत्त्वाचं ठरतं. हे दुहेरी लाभ म्हणजे चांगला परतावा (Returns) आणि कर सवलत (Tax Benefit). अशाच काही पर्यायांबाबत ही माहिती...

पुढे वाचा ...
  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 4 मार्च: नोकरी करणाऱ्या लोकांना (Salary persons) नेहमीच गुंतवणूक (Investment) कुठे करावी, जेणेकरून आपल्याला चांगला लाभ मिळेल, याची चिंता सतावत असते. तज्ज्ञांच्या मते, नोकरी सुरू झाल्याबरोबर गुंतवणूक करणं सुरू केलं पाहिजे. पगार कमी असो वा जास्त थोडी थोडी गुंतवणूक करणं अत्यावश्यक आहे. ही गुंतवणूक करताना दुहेरी लाभ जिथं मिळतो तिथं ती करणं महत्त्वाचं ठरतं. हे दुहेरी लाभ म्हणजे चांगला परतावा (Returns) आणि कर सवलत (Tax Benefit). अशाच काही पर्यायांबाबत ही माहिती...

1) पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) : पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीपीएफ (PPF) ही दीर्घ काळासाठी करण्यात येणाऱ्या गुंतवणूक पर्यायांपैकी एक लोकप्रिय पर्याय आहे. यातील गुंतवणूक सुरक्षित आणि उत्तम परतावा देणारी असते. पीपीएफवर नेहमीच 7 ते 8 टक्के दरानं व्याज मिळते. अर्थव्यवस्थेच्या स्थितीनुसार यात चढ-उतार होतात मात्र ते फार मोठे नसतात. सध्या पीपीएफचा व्याजदर 7.1 टक्के इतका आहे. दर वर्षी चक्रवाढ पद्धतीनं व्याज दिलं जातं. दर तीन महिन्यांनी सरकारकडून व्याजदरांचा आढावा घेतला जातो आणि त्यात बदल केले जातात. ही गुंतवणूक करमुक्त असते. यावरील व्याज आणि मुदतीनंतर मिळणारी रक्कमही कर मुक्त असते.

2) सोने (Gold) : आपल्या देशात सोन्यातील गुंतवणूकीला पूर्वापार महत्त्व देण्यात आलं आहे. अर्थात बदलत्या काळात आधुनिक पद्धतीनं सोन्यातील गुंतवणूक केली जाते. यामध्ये गोल्ड ईटीएफ(Gold  ETF), गोल्ड बाँडस (Gold Bonds) आदी पर्यायांचा समावेश आहे. जे गुंतवणूकदार वेगवेगळ्या पर्यायांमधील गुंतवणुकीत सोन्यातील गुंतवणुकीचा समावेश करतात त्यांची गुंतवणूक समतोल असते,असं तज्ज्ञांच मत आहे.

अवश्य पाहा - Freelancing च्या माध्यमातून घरबसल्या कमवा 10 लाख रुपये; ही 5 कामं येणं आवश्यक

3) इक्विटी म्युच्युअल फंड : नोकरदार व्यक्तींनी आपल्या गुंतवणुकीतील एक हिस्सा म्युच्युअल फंड्समध्ये (Mutual Funds) गुंतवला पाहिजे, असं तज्ज्ञ सांगतात. यासाठी एसआयपीद्वारे (SIP) गुंतवणूक करणं जास्त लाभदायी ठरतं. यांमध्ये शेअर बाजारातील तेजीचा फायदा मिळतो. म्युच्युअल फंडामध्ये अगदी 500 रुपयांपासूनही गुंतवणूक करता येते. ज्यांनी नुकतीच नोकरी सुरू केली आहे, अशांसाठी म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय आहे.

4) रिकरिंग डीपॉझिट : रिकरिंग डीपॉझिट-आरडी (Recuring Deposit-RD) म्हणजेच आवृत्ती ठेव योजना. यामध्ये दर महा काही रक्कम गुंतवली जाते. नियमित गुंतवणुकीसाठी हा एक चांगला पर्याय आहे. बहुतांश बँकामध्ये किमान 500 रुपयांपासून ही योजना सुरू करता येते. यासाठी बँकांचे दर वेगवेगळे असतात. सध्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आरडीसाठी 5 ते 5.4 टक्के व्याजदर आहे.

First published:

Tags: Investment, Money, Savings and investments, Small investment business