Home /News /coronavirus-latest-news /

कर्मचारीच नव्हे तर त्यांच्या कुटुंबीयांसाठीही Reliance ची मोठी लसीकरण मोहीम, 880 शहरात मिळणार मोफत लस

कर्मचारीच नव्हे तर त्यांच्या कुटुंबीयांसाठीही Reliance ची मोठी लसीकरण मोहीम, 880 शहरात मिळणार मोफत लस

देशातल्या कोणत्याही कॉर्पोरेट कंपनीने आखलेली सर्वांत मोठी लसीकरण मोहीम (Corporate Vaccination Drive) ठरेल, अशा उपक्रमाचं नियोजन रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने (Reliance Industries Limited) केलं आहे.

    मुंबई, 27 मे: देशातल्या कोणत्याही कॉर्पोरेट कंपनीने आखलेली सर्वांत मोठी लसीकरण मोहीम (Corporate Vaccination Drive) ठरेल, अशा उपक्रमाचं नियोजन रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने (Reliance Industries Limited) केलं आहे. त्याअंतर्गत देशातल्या 880 शहरांत असलेले कंपनीचे 13 लाखांहून अधिक कर्मचारी, सहयोगी, पार्टनर्स (BP, गुगल यांच्यासारखे) आणि त्यांचे कुटुंबीय आदींचं कोरोना प्रतिबंधक लसीकरण (Vaccination) पूर्णतः मोफत केलं जाणार आहे. तसंच, संबंधित कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांमध्ये पती/पत्नी, आई-वडील, आजी-आजोबा, सासू-सासरे, लसीकरणास पात्र असलेली मुलं आणि भावंडं अशा सर्वांचा समावेश या लसीकरण कार्यक्रमासाठी करण्यात आला आहे. रिलायन्समधून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही या लसीकरण कार्यक्रमांतर्गत सामावून घेतलं जाणार आहे. यासाठी पात्र असलेले सर्व कर्मचारी आणि कुटुंबीय यांना को-विन प्लॅटफॉर्मवर (Co-WIN Platform) नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर ते जिओ हेल्थक्लब (Jio Healthclub) या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या ऑनलाइन हेल्थकेअर प्लॅटफॉर्मद्वारे त्यांना सोयीच्या असलेल्या ठिकाणी लसीकरणाचा स्लॉट बुक करू शकतात. हे वाचा-काय सांगता! तिसऱ्या लाटेपूर्वीच 30 टक्के लहान मुलांना होऊन गेला कोरोना? सरकारने वर्कप्लेस व्हॅक्सिनेशन पॉलिसी (Workplace Vaccination Policy) अर्थात कार्यालयांमध्ये लसीकरण करण्याचं धोरण जाहीर केलं आहे. त्या धोरणांतर्गत रिलायन्स हा उपक्रम राबवणार आहे. जामनगर, बडोदा, हझिरा, दहेज, पाताळगंगा, नागोठणे, कनिकाडा, गडिमोगा, साहडोल, बाराबंकी, होशियारपूर येथे असलेल्या रिलायन्सच्या ऑक्युपेशनल हेल्थ सेंटर्समध्ये (Occupational Health Centers) या उपक्रमांतर्गत लसीकरण केलं जाणार आहे. त्याशिवाय 800हून अधिक शहरांमध्ये असलेली रिलायन्सची हॉस्पिटल्स, तसंच अपोलो, मॅक्स, मणिपाल अशा पार्टनर हॉस्पिटल्समध्येही हे लसीकरण केलं जाणार आहे. जे कर्मचारी किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी आधीच लस घेतली असेल, त्यांना त्यासाठी आलेल्या खर्चाचा परतावा दिला जाणार आहे. कंपनीच्या साडेतीन लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांनी याआधीच लशीचा पहिला डोस घेतला आहे. 15 जूनपर्यंत सर्व कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना लशीचा निदान पहिला डोस देण्याचं उद्दिष्ट रिलायन्स कंपनीने ठेवलं आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि त्यांच्या ग्रुप कंपन्यांमधल्या कर्मचाऱ्यांसह स्टोअर लेव्हल स्टाफ म्हणजेच सुमारे 13 हजार रिटेल आणि जिओ स्टोअर्समधल्या कर्मचाऱ्यांचंही लसीकरण या उपक्रमांतर्गत केलं जाणार आहे. हे वाचा-तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर बालकांची काळजी कशी घ्यावी? आपल्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी खासगी कंपन्यांना/संस्थांना लस विकत घेण्याची परवानगी सरकारकडून मिळाल्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने सिरम इन्स्टिट्यूटकडून कोविशिल्ड (Covishield) आणि भारत बायोटेककडून कोव्हॅक्सिन (Covaxin) या दोन्ही लशींच्या डोसेसची खरेदी केली आहे. कंपनीचा लसीकरण कार्यक्रम मुंबईत, तसंच उत्पादन करणाऱ्या युनिट्समध्ये सुरू झाला आहे. तसंच, पुढच्या आठवड्यापर्यंत राज्यांच्या राजधान्या आणि महत्त्वाच्या शहरांमध्येही हा कार्यक्रम सुरू होईल. त्यानंतर रिलायन्सच्या पार्टनर कंपन्यांचे कर्मचारी असलेल्या शहरांत हा कार्यक्रम सुरू होईल. त्यासाठी पार्टनर हॉस्पिटल्सशी आणि क्लिनिक्सशी करार करण्यात आले आहेत. रिलायन्सचा हा वेगवान आणि व्यापक लसीकरण कार्यक्रम त्यांचे कर्मचारी आणि कुटुंबीयांना तर सुरक्षाकवच देणारच आहे; तसंच सार्वजनिक आरोग्य यंत्रणेवरचा ताण, तिथली गर्दी कमी करण्यासही हातभार लावणार आहे. त्यामुळे कोरोनाच्या भयानक साथीने उभ्या केलेल्या आव्हानांना प्रभावीपणे तोंड देण्यास देशाला मदत होणार आहे.
    First published:

    Tags: Corona, Corona patient, Corona vaccination, Corona vaccine, Corona vaccine cost, Reliance, Reliance Industries

    पुढील बातम्या