मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

1 मेपासून 18+ सर्वांना मिळणार कोरोना लस, शनिवारपासून CoWin वर रजिस्ट्रेशनला सुरुवात

1 मेपासून 18+ सर्वांना मिळणार कोरोना लस, शनिवारपासून CoWin वर रजिस्ट्रेशनला सुरुवात

1 मेपासून अठरा वर्षांवरील सर्वांना कोरोना लस दिली जाणार आहे. या टप्प्यात ज्या नागरिकांना लस घ्यायची आहे, ते येत्या शनिवारपासून कोविन अॅपवर (CoWin App) रजिस्ट्रेशन (Registration for Covid Vaccine) करू शकतात.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 22 एप्रिल : लसीकरणाबाबत (Corona Vaccination) सरकारनं केलेल्या घोषणेनंतर आता 1 मेपासून अठरा वर्षांवरील सर्वांना कोरोना लस दिली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या टप्प्यात ज्या नागरिकांना लस घ्यायची आहे, ते येत्या शनिवारपासून कोविन अॅपवर (CoWin App) रजिस्ट्रेशन (Registration for Covid Vaccine) करू शकतात. सध्या देशात 45 वर्षाहून अधिक वय असणाऱ्या नागरिकांना लस दिली जात आहे.

केंद्र सरकारनं सोमवारीच व्हॅक्सिनच्या पुढील टप्प्याबाबतची घोषणा केली. यामध्ये 1 मेपासून `18 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्वांना लस घेण्याची परवानगी देण्यात आली. कोरोनाचा प्रसार वेगानं वाढत असल्यानं तरुणांना लस देण्याची मागणीही वाढत होती, याच दरम्यान ही घोषणा करण्यात आली.

मुंबईचा 'ऑक्सिजन मॅन'! गरजूंना प्राणवायू मिळवून देण्यासाठी विकली महागडी SUV कार

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, नॅशनल हेल्थ अथॉरिटीचे सीईओ आर एस शर्मा गुरुवारी म्हणाले, की 18 वर्षावरील सर्वांसाठी व्हॅक्सिनेशन रजिस्ट्रेशन 48 तासांमध्ये सुरू होईल. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनशिवाय काही लसीकरण केंद्रांवर रशियन लस स्पुतनिक V चा पर्यायही उपलब्ध असेल. लसीकरण वेगानं व्हावं यासाठी अधिक केंद्र स्थापित केले जात आहेत. शर्मा यांनी सांगितलं, की खासगी कंपन्यांनाही कोविन अ‍ॅपवर लसीकरणाचं वेळापत्रक प्रकाशित करण्यास सांगितले गेले आहे.

सरकारी आकडेवारीनुसार, गुरुवारी सकाळी सात वाजेपर्यंत देशात 13 कोटी 23 लाख 30 हजार 644 लसीचे डोस दिले गेले आहेत. देशात मागील चोवीस तासात 22 लाख 11 हजार 334 जणांना लस दिली गेली आहे. तर, आतापर्यंत 11 कोटी 31 लाख 47 हजार 596 जणांना लसीचा पहिला डोस दिला गेला आहे. तर, दोन डोस घेणाऱ्यांची संख्या 1 कोटी 91 लाख 83 हजार 48 इतकी आहे. आकडेवारीनुसार, लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र (Corona Vaccination in Maharashtra) सर्वात पुढे आहे. राज्यात 1 कोटी 32 लाख 79 हजार 970 नागरिकांना लसीचा पहिला किंवा दुसरा डोस दिला गेला आहे.

First published:

Tags: Corona, Corona vaccine, Corona vaccine in market, Vaccinated for covid 19