Home /News /mumbai /

मुंबईचा 'ऑक्सिजन मॅन'! गरजूंना प्राणवायू मिळवून देण्यासाठी त्याने विकली महागडी SUV कार

मुंबईचा 'ऑक्सिजन मॅन'! गरजूंना प्राणवायू मिळवून देण्यासाठी त्याने विकली महागडी SUV कार

जसजसे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढू लागली आहे, तसतशी लोकांमधील नेगिटिव्हिटी देखील वाढत आहे. मात्र काही घटना अशा घडतात ज्या माणुसकीवर, कर्तव्यनिष्ठेवर, सकारात्मकतेवर विश्वास ठेवण्यास भाग पाडतात. अशीच कहाणी आहे मुंबईच्या 'ऑक्सिजन मॅन'ची

पुढे वाचा ...
    मुंबई, 22 एप्रिल : कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा (Lack of oxygen Supply) कमी पडत असल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. बुधवारी नाशिकमध्ये (Nashik Oxygen Incident) तर ऑक्सिजन टँकरला गळती लागल्याने जवळपास 22 रुग्णांचा ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने मृत्यू झाला. अत्यवस्थ रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेतच मात्र खाजगी पातळीवर देखील अनेकजण मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. यामध्ये मुंबईच्या शाहनवाज शेख यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. ऑक्सिजनसाठीची शेख यांची कामगिरी पाहून त्यांना भागात 'ऑक्सिजन मॅन' म्हणून ओळखलं जातंय. ते त्यांच्या पातळीवर लोकांपर्यंत ऑक्सिजन पोहोचविण्याचे सतत काम करत आहेत. मदतीसाठी त्यांनी आपली कार विकली शाहनवाज यांना सतत ऑक्सिजनची मागणी असणार्‍या लोकांचे कॉल येत आहेत. अशा परिस्थितीत, ते प्रत्येकास मदत करण्याचा प्रयत्न करतात, परंतु मर्यादित स्त्रोतांमुळे ते केवळ काही लोकांना मदत करू शकत होते. म्हणून त्यांनी विचार करून अखेर रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरू ठेवण्यासाठी आपली एसयूव्ही कार देखील विकली. कार 22 लाख रुपयांना विकल्यानंतर 160 ऑक्सिजन सिलिंडर खरेदी करू शकलो आणि आवश्यक रुग्णांना आम्ही ते पोहोचवले, असे शेख म्हणाले. (हे वाचा: ‘Remdesivir अन् ऑक्सिजनशिवाय 85 टक्के रुग्ण होताहेत बरे’, AIIMS चे डॉक्टर म्हणाले…) मित्राच्या पत्नीचा ऑक्सिजन अभावी झाला होता मृत्यू.. गेल्या वर्षी शाहनवाज यांच्या एका मित्राच्या पत्नीचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला होता. त्यांना ऑक्सिजनची फार गरज होती, परंतु त्यांना वेळत ऑक्सिजन उपलब्ध होऊ न शकल्यामुळे ऑटो रिक्षात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा मोठा परिणाम शाहनवाज यांच्या मनावर झाला आणि त्यांनी त्या दिवसापासून ऑक्सिजनसाठी लोकांना मदत करण्याचा निर्णय घेतला. (हे वाचा: Coronavirus Updates : देशात बुधवारी कोरोनाचे 3.16 लाख नवे रुग्ण, भारतानं अमेरिकेलाही टाकलं मागे) आज परिस्थिती अशी आहे की, त्यांनी गरजूंसाठी एक हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. या बरोबरच लोकांना योग्य वेळी मदत मिळावी यासाठी त्यांनी स्वत: एक वॉररूम देखील तयार केली असून त्याद्वारे ते लोकांना मदत करत असतात.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Corona updates, Mumbai News, Oxygen supply

    पुढील बातम्या