Home /News /coronavirus-latest-news /

चिंता मिटली! भारतात कोरोनाचं रूप बदललं नाही, PMOनं लशीबाबत दिली महत्त्वपूर्ण माहिती

चिंता मिटली! भारतात कोरोनाचं रूप बदललं नाही, PMOनं लशीबाबत दिली महत्त्वपूर्ण माहिती

भारतातही कोरोनाची लस तयार करण्याचे काम सुरू आहे. मात्र कोरोनाचं रुप बदलले असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती, याबाबत भारत सरकारने शनिवारी माहिती दिली.

    नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर : प्रभावी कोरोनाव्हायरस (Coronavirus Vaccine) लस तयार करण्यासाठी सर्वच देश प्रयत्न करत आहेत. भारतातही कोरोनाची लस तयार करण्याचे काम सुरू आहे. मात्र कोरोनाचं रुप बदलले असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती, याबाबत भारत सरकारने शनिवारी सांगितले की, कोरोनाव्हायरसशी निगडीत दोन अभ्यासांमध्ये असे दिसून आले की, हा व्हायरस स्थिर आहे आणि त्याच्या रूपात कोणतेही मोठे बदल झाले नाहीत. काही तज्ज्ञांनी याआधी चिंता व्यक्त केली होती की, कोरोनाच्या स्वरुपात बदल झाल्यानंतर लस तयार करण्यास अडथळा येऊ शकतो. मात्र नुकत्याच झालेल्या काही जागतिक अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की व्हायरसच्या स्वरुपात नुकत्याच झालेल्या बदलांमुळे कोरोनावरील लसींवर परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. वाचा-आता ठरलंच! भारतात दिली जाणार रशियन लस; Sputnik V च्या ट्रायलला मंजुरी कोव्हिड -19 जागतिक साथीच्या स्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीनंतर पंतप्रधान कार्यालयाने (PMO) निवेदनात म्हटले आहे की, भारतातील तीन लशी प्रगत अवस्थेत आहेत, त्यापैकी दोन लसी दुसर्‍या टप्प्यात आणि एक लस तिसऱ्या टप्प्यात आहे. पीएमओने सांगितले की, 'आयसीएमआर (ICMR) आणि बायोटेक्नॉलॉजी डिपार्टमेंटच्या (डीबीटी) एसएआरएस-कोव्ह-2 च्या (Covid-19 Virus) जीनोमबाबत केलेल्या अभ्यासात असे आढळले आहे की व्हायरस अनुवांशिकदृष्ट्या स्थिर आहे आणि त्याच्या स्वरूपात कोणतेही मोठे बदल झाले नाहीत. वाचा-आता ठरलंच! भारतात दिली जाणार रशियन लस; Sputnik V च्या ट्रायलला मंजुरी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी गेल्या महिन्यात सांगितले की भारतात कोरोनाव्हायरसच्या स्ट्रेनमध्ये कोणतेही मोठे किंवा महत्त्वपूर्ण बदल झालेले नाही आहेत. ते म्हणाले होते की इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) गेल्या काही महिन्यांत राष्ट्रीय स्तरावर संकलित केलेल्या ‘स्ट्रेन्स’चा विस्तृत अभ्यास केला. ऑक्टोबरच्या सुरुवातीस व्हायरसच्या स्वरुपातील बदलांविषयी माहिती उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले होते. वाचा-Covid 19: भारतातील कोरोना रुग्णांच्या उपचारांमध्ये बदल होणार पीएमओने निवेदनात म्हटले आहे की, 'नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सीन एडमिनिस्टेशन फॉर कोव्हिड-19 यांनी राज्य सरकार आणि सर्व संबंधित भागधारकांसोबत मिळूळ लशींचे संग्रहण, वितरण आणि परिचय यासाठी सविस्तर ब्लू प्रिंट तयार केली आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona, Corona vaccine

    पुढील बातम्या