COVID-19: भारतात कोरोना रुग्णांच्या उपचारांमध्ये बदल होणार, ट्रायलनंतर 'या' औषधांबाबत निर्णय

COVID-19: भारतात कोरोना रुग्णांच्या उपचारांमध्ये बदल होणार, ट्रायलनंतर 'या' औषधांबाबत निर्णय

भारतामध्ये कोरोना (Corona) रुग्णांच्या उपचार पद्धतीमध्ये मोठे बदल होणार आहेत. कोरोनावरील औषधांची सध्या ट्रायल सुरू आहे. ही ट्रायल पूर्ण झाल्यानंतर निर्णय घेण्यात येईल.

  • Share this:

मुंबई, 17 ऑक्टोबर: भारतातील कोरोनाग्रस्त रुग्ण सापडण्याचं प्रमाण हळूहळू कमी होत चाललं आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने सध्या कोविडच्या रुग्णांना दिल्या जाणाऱ्या ट्रिटमेंटच्या प्रोटोकॉलचा फेरआढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO)औषधांचा परिणाम काय होतो हे पाहण्यासाठी काही प्रयोग केले होते. त्यांचा निष्कर्ष WHOने जाहीर केला आहे. सध्या कोरोना रुग्णांना दिली जाणारी अँटिव्हायरल रेमेडिसविर, मलेरियाचं औषध हायड्रॉक्सिक्लोरोक्विन, अँटि-एचआयव्ही संयोजनावरील लोपिनवीर व रीटोनवीर आणि इम्युनोमॉड्युलेटर इंटरफेरॉन ही चार औषधं देण्यात येत आहेत. पण ही औषधं रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण कमी करण्यात फारशी फायदेशीर ठरत नसल्याचं डब्ल्युएचओचं म्हणणं आहे. यातील पहिली 2 औषधं ज्यांना कोरोनाचा थोडा संसर्ग झाला आहे अशा रुग्णांना दिली जातात. आयसीएमआर (ICMR)चे डॉ. बलराम भार्गव आणि डॉ. व्ही. के. पॉल यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या संयुक्त कार्यसमितीच्या बैठकीत या प्रोटोकॉलचा फेरअढावा घेतला जाईल.

डब्ल्युएचओच्या सॉलिडॅरिटी ट्रायलच्या अभ्यासात 30 देशांतल्या 405 रुग्णालयांतील रुग्णांना ही औषधं दिली होती त्यांचा फारसा परिणाम न झाल्याची शंका आहे. या अभ्यासात कोरोनाच्या 11 हजार 266 प्रौढ रुग्णांचा समावेश होता. त्यापैकी 2 हजार 750 जणांना रेमेडिसवीर, 954 जणांना एचसीक्यू, 1 हजार 411 जणांना लोपिनवीर, 651 जणांना इंटरफेरॉन आणि लोपिनवीर, 1 हजार 412 जणांना फक्त इंटरफेरॉन तर 4 हजार 88 जणांना इतर औषधं दिली होती. याचा अभ्यास अजून पूर्ण झालेला नाही.

सध्याची औषधं परिणामकारक आहेत का ?

या ट्रायलमध्ये भारतही सहभागी झाला होता आणि या 4 औषधांचे प्रयोग भारतातही झाले. ICMRच्या म्हणण्यानुसार 15 ऑक्टोबर 2020 पर्यंत 26 ठिकाणच्या 937 कोरोना रुग्णांवर हा प्रयोग झाला. पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडियाचे संस्थापक डॉ. के. श्रीनाथ रेड्डी म्हणाले,  "ही औषधं परिणामकारक आहेत की नाही हे उत्तर शोधणं गरजेचं होतं. तोच या ट्रायलचा उद्देश होता. त्यातून असं लक्षात आलं की, ही 4 औषधं परिणामकारक नाहीत. इंटरफेरॉनसारखं औषध रुग्णालयातील रुग्णांना अपायच पोहचवत आहेत लक्षात आलं आहे. त्यामुळे ते देण्याचा काहीच फायदा नाही. त्यामुळे येत्या काळात कोरोनावरील उपचाराची पद्धत बदलण्याची शक्यता आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: October 17, 2020, 4:55 PM IST

ताज्या बातम्या