Home /News /coronavirus-latest-news /

कोरोनामुक्त झाल्यानंतर दात आणि हिरड्या देतायेत धोक्याची घंटा; तुम्ही तपासणी केली का?

कोरोनामुक्त झाल्यानंतर दात आणि हिरड्या देतायेत धोक्याची घंटा; तुम्ही तपासणी केली का?

कोरोनामुक्त झाल्यानंतर लाँग कोविडची (Long Covid) समस्या उद्भवते. यामध्ये दात आणि हिरड्यांचाही समावेश आहे.

मुंबई, 17 जून : कोरोनाची दुसरी लाट (Corona Second Wave) आता हळूहळू ओसरत आहे. गेल्या महिन्यात देशभरात दररोज चार लाख नव्या रुग्णांची भर पडत होती. आता हा आकडा एक लाखापेक्षा खाली आला आहे. त्यामुळे एक चिंता कमी झाली असली, तरी अनेक लोकांना कोरोनातून बरं झाल्यानंतर वेगवेगळ्या आरोग्य समस्या जाणवत आहेत. या समस्यांना डॉक्टर लाँग कोविड (Long Covid) असं संबोधतात. कोरोनानंतर बराच काळ लोकांना त्रास देणाऱ्या समस्यांचा त्यात समावेश होतो. यामध्ये दात आणि हिरड्यांचाही (Teeth and gum problem after corona recovery) समावेश आहे. लाँग कोव्हिडबाबत न्यूज 18 विविध डॉक्टरांकडून अधिक माहिती घेत आहेत. कोरोनामुक्त झाल्यानंतर दातांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तसंच, दातांतून दीर्घ काळपर्यंत रक्त येणं ही धोक्याची घंटा असू शकते, असं राजन डेंटल इन्स्टिट्यूटचे (Rajan Dental Institute) मेडिकल डायरेक्टर आणि चेन्नई डेंटल रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. गुनासीलन राजन यांनी सांगितलं. हे वाचा - महाराष्ट्रात धडकणार तिसरी कोरोना लाट; परिणामांबाबत WHO-AIIMSने जारी केला रिपोर्ट न्यूज 18शी बातचीत करताना डॉक्टर राजन (Dr Rajan) यांनी सांगितलं, की कोविड-19च्या महामारीदरम्यान लोक डेंटिस्टकडे (Dentist) जायला घाबरत आहेत. खरं तर डेंटिस्ट आणि पेशंट अशा दोन्हींच्याही मनात भय निर्माण झालं आहे. कारण डेंटिस्ट बऱ्याच जवळून दातांची तपासणी करतात. त्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो. कोरोनातून बरे झालेले अनेक रुग्ण दातांची समस्या असूनही डेंटिस्टकडे जायला का-कू करतायत; पण दुर्लक्ष करून उपयोग नाही. सर्वसाधारण वाटणारे अल्सर किंवा गाठदेखील बराच काळ दुर्लक्ष केल्यास कॅन्सरमध्ये परिवर्तित होऊ शकते. त्याशिवाय ब्लॅक फंगस (Black Fungus) म्हणजे म्युकर्मायकॉसिसचा धोकाही आहेच. अनेकांनी ब्लॅक फंगससारख्या गोष्टीकडे सुरुवातीला दुर्लक्ष केलं; पण नंतर त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं, असं आपण स्वतः पाहिलं असल्याचं त्यांनी नमूद केलं. डॉ. राजन यांनी सांगितलं, की कोविडमधून बरं झाल्यानंतर दातांच्या स्वच्छतेकडे अजिबात दुर्लक्ष करून उपयोगी नाही. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना दात घासणं, फ्लॉसिंग, तसंच कोविड झालेला असताना आणि नंतर महिनाभर दिवसातून तीन वेळा एक टक्का पोविडोन-आयोडीन माउथवॉश घेणं या गोष्टी आवश्यक आहेत. हे वाचा - कोरोनामुक्त झाल्यानंतर हिरड्या, नाकातून होणाऱ्या रक्तस्रावाकडे दुर्लक्ष नको हिरड्यांचं आरोग्य चांगलं राखणंही तितकंच महत्त्वपूर्ण आहे. कारण हिरड्यांचं आरोग्य चांगलं नसेल, तर मधुमेहाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे नियमितपणे डेंटिस्टकडे जाणं आणि अल्ट्रासॉनिक स्केलिंग आवश्यक आहे. हिरड्यांमधली दुखी, दातांमधली दुखी आदी लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. कारण ती ब्लॅक फंगसची लक्षणंही असू शकतात, असं डॉक्टर राजन यांनी नमूद केलं.
Published by:Priya Lad
First published:

Tags: Corona, Coronavirus, Health

पुढील बातम्या