नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी : गेली दोन तीन वर्षे कोरोनाने जगभरात अक्षरशः थैमान मांडलं होतं. प्रत्येक जण आपला जीव मुठीत धरूनच होता. आपल्यालाही कोरोनाची लागण होईल, आपलाही मृत्यू होईल, अशी भीती प्रत्येकाच्या मनात घर करून बसली होती. पण याच कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाखो भारतीयांना वाचवलं आहे. मोदी सरकारच्या एका निर्णयामुळे एक-दोन नव्हे तब्बल 34 लाख भारतीय वाचले आहेत. कोरोनासारखा खतरनाक व्हायरसही त्यांचा जीव घेऊ शकला नाही.
कोरोनाविरोधी लढ्यात कोरोना लशीचं शस्त्र तयार झालं आणि भारतात 16 जानेवारी 2021 पासून कोरोना लसीकरण सुरू झालं. मोदी सरकारने खास कोव्हिड लसीकरण मोहीम राबवली आणि लोकांना मोफतमध्ये कोरोना लस दिली. वर्षभरात देशातील कमीत कमी 90% लोकांनी एक डोस तरी घेतला. आता याच लसीकरणाच्या परिणामाचा एक रिपोर्ट आला. ज्यात कोरोना लशीमुळे 3.4 दशलक्ष पेक्षा जास्त म्हणजे तब्बल 34 लाखांहून अधिक लोकांचा जीव वाचल्याचं नमूद करण्यात आलं आहे.
Shocking! इथं खरंच माणसं बनलीत Zombie; व्हायरस नव्हे हा औषधाचा भयानक परिणाम
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी स्टँफोर्ड द इंडिया डायलॉगमध्ये ही माहिती दिली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ते या बैठकीत सहभागी झाले. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
India was able to save more than 3.4 million lives by undertaking nationwide COVID-19 vaccination campaign at an unprecedented scale, said Union Minister @mansukhmandviya while addressing 'The India Dialog' session at the release of a paper by Stanford University @MoHFW_INDIA pic.twitter.com/F3Jo5ZmUvh
— DD News (@DDNewslive) February 25, 2023
आरोग्यमंत्री मांडविया म्हणाले, जागतिक आरोग्य संघटनेने नुकतंच 30 जानेवारीला कोरोना आंतरराष्ट्रीय चिंता दिवस घोषित केलं. पण त्याआधीच भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना महासाथीविरोधात सकारात्मक पाऊल उचललं.
भारताने बनवली नाकावाटे दिली जाणारी लस
भारतात इंजेक्शनमार्फत दिल्या जाणाऱ्या लशी तयार झाल्याच. पण सोबतच मेड इन इंडिया नझल व्हॅक्सिनही तयार करण्यात आली. भारतातील पहिली नेझल व्हॅक्सिन इनकोव्हॅक जानेवारीत लाँच करण्यात आली. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागाअंतर्गत असलेल्या बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टन्स या जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन सहकार्यासाठी असलेल्या सार्वजनिक उपक्रमाच्या सहकार्यानं भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडने ही लस विकसित केली आहे.
18 पुशअप्स मारून उठला, तोच जमिनीवर कोसळला; तरुण पोलिसाच्या मृत्यूचा LIVE VIDEO
राज्य खासगी रुग्णालयात सरकारे आणि भारत सरकारद्वारे केल्या जाणाऱ्या मोठ्या प्रमाणातील खरेदीसाठी iNCOVACC लशीची किंमत 325 रुपये प्रति डोस/मात्रा इतकी निश्चित करण्यात आली आहे. तर खासगी रुग्णालयात या लशीची किंमत 800 रुपयांपर्यंत असेल असं याआधी सांगण्यात आलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona vaccination, Corona vaccine, Coronavirus