जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Shocking! इथं खरंच माणसं बनलीत Zombie; व्हायरस नव्हे हा औषधाचा भयानक परिणाम

Shocking! इथं खरंच माणसं बनलीत Zombie; व्हायरस नव्हे हा औषधाचा भयानक परिणाम

फोटो सौजन्य - Twitter/@dammiedammie35

फोटो सौजन्य - Twitter/@dammiedammie35

माणसांना झोम्बीसारखं बनवणाऱ्या या औषधामुळे भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे.

  • -MIN READ Trending Desk Delhi
  • Last Updated :

    वॉशिंग्टन, 23 फेब्रुवारी : काही औषधांचे गंभीर साइड इफेक्ट्स होतात. म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय विनाकारण औषधं घेऊ नयेत, असं डॉक्टर सांगतात; मात्र काही औषधं नशेसाठी घेतली जातात. अमेरिकेत अशाच एका औषधानं सध्या हाहाकार माजवलाय. Xylazine असं त्या औषधाचं नाव आहे. या औषधाचा परिणाम होऊन अनेकांचा अवतार झोंबीसारखा झाला आहे. अमेरिकेतल्या अनेक राज्यांमध्ये या औषधामुळे भयानक परिस्थिती निर्माण झालीय. या औषधाला Tranq Dope किंवा Zombie Drug असंही म्हटलं जातं.  ट्रँक डोप म्हणजे Fentanyl आणि Xylazine या औषधांचं एकत्रिकरण. न्यूयॉर्क टाइम्सच्या एका वृत्तानुसार, या औषधाचा उपयोग जनावरांना बेशुद्ध करण्यासाठी केला जातो. फिलाडेल्फियामध्ये पहिल्यांदा हे औषध वापरलं गेलं. त्यानंतर सॅन फ्रान्सिस्कोबरोबरच अमेरिकेतल्या इतर काही राज्यांमध्येही त्याची विक्री वाढली. अमेरिकेतल्या फूड अँड ड्रग्ज अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने हे औषध जनावरांसाठी वापरण्याची परवानगी दिली होती; मात्र आता काही जण त्याचा वापर नशेसाठी करतात. अनेक जण त्याचा वापर हेरॉइनसारख्या ड्रगमध्ये सिंथेटिक कटिंग एजंटसारखा करतात. अमेरिकेतल्या रस्त्यांवर काही डॉलर किमतीत ते सहज विकलं जातंय. कोरोनाच्या भीतीने महिलेने मुलासह स्वतःला 3 वर्षे घरात कोंडलं, नवऱ्यालाही घेतलं नाही; आता दरवाजा उघडताच… या औषधामध्ये गुंगी आणणारे घटक आहेत. ते घेतल्यावर लगेचच झोप येऊ लागते. श्वास मंदावतो. त्वचेवर जखमा होऊन ती सडायला लागते. औषधाचा वारंवार वापर केला, तर त्या जखमा वाढतात व एक वेळ अशी येते, की जीव वाचवण्यासाठी शरीराचा तो भाग कापून टाकावा लागतो. आतापर्यंत Xylazine हे औषध घोडे आणि गायींवर वापरलं गेलं. या औषधाच्या जास्त वापरामुळे गुंगीच्या औषधाप्रमाणे परिणाम होतो. खूप थकवा येणं, श्वास मंदावणं आणि जखमा होणं हे याचे गंभीर परिणाम आहेत. या जखमांवर उपचार न केल्यास हळूहळू तिथली त्वचा कुजते. हे औषध झोप येण्यासाठी उपयोगी असल्याने जास्त डोस धोकादायक ठरू शकतो. Fentanyl सारख्या औषधांसोबत वापरलं गेल्यास या औषधाच्या जास्तीच्या डोसमुळे खूप गाढ झोप लागून काही तासांनंतर जाग येऊ शकते. अशा पद्धतीने औषध घेतलेल्यांचा अपघात होण्याचा किंवा एखादी दुर्घटना होण्याचा धोका असतो. घशात खवखव, पायात तीव्र वेदना आणि तरुणाचा गेला जीव; डॉक्टरांनाही मृत्यूनंतर समजलं धक्कादायक कारण “ट्रँक डोपमुळे माणसांचं शरीर झोंबीप्रमाणे बनतंय. 9 महिन्यांपूर्वी माझ्या शरीरावर एकही जखम नव्हती, पण आता पायांवर भोकं पडली आहेत,” असं एका 28 वर्षीय तरुणानं म्हटलंय. या औषधाच्या परिणामांमुळे अमेरिकेतली आरोग्यव्यवस्था पुरती हादरली आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात