मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

कोरोनापासून बचावासाठी केलेली 'ती' प्रार्थना आली फळाला; सामूहिक मुंडण करत गावातील नागरिकांचा जल्लोष, VIDEO

कोरोनापासून बचावासाठी केलेली 'ती' प्रार्थना आली फळाला; सामूहिक मुंडण करत गावातील नागरिकांचा जल्लोष, VIDEO

गावातील लोकांनी देवाकडे अशी प्रार्थना केली होती की वर्षभरात गावात कोरोनाने एकाही व्यक्तीचा मृत्यू न झाल्यास गावातील लोक सामूहिक मुंडण करतील.

  • Published by:  Kiran Pharate

भोपाळ 01 जानेवारी : जवळपास मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारीने देशभरात (Coronavirus in India) थैमान घातलं आहे. केवळ भारतातच नाही तर जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोनाने हाहाकार माजवला आहे. कोरोनाच्या प्रसारामुळे नागरिकांना अनेक निर्बंध आणि नियमांचं पालन करून घराबाहेर पडावं लागत आहे. अशात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. यादरम्यान मध्य प्रदेशमधून (Madhya Pradesh) एक अतिशय दिलासादायक बातमी समोर आली आहे.

मुंबई-पुण्याची स्थिती वेगाने बिघडलीय म्हणत अजित पवारांनी दिले Lockdown चे संकेत

मध्य प्रदेशच्या निमच येथील एका गावात वर्षभरात कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. या गावातील लोकांनी देवाकडे अशी प्रार्थना केली होती की वर्षभरात गावात कोरोनाने एकाही व्यक्तीचा मृत्यू न झाल्यास गावातील लोक सामूहिक मुंडण करतील. या गोष्टीला 31 डिसेंबरला एक वर्ष पूर्ण झालं.

विशेष बाब म्हणजे काही महिन्यांपूर्वी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशभरात थैमान घातलं. या काळात उपचाराअभावी तसंच इतर कारणांमुळे अनेक कोरोना रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. मात्र या कठीण परिस्थितीतही या गावातील लोक सुखरूप राहिले. गावातील एकाही व्यक्तीचा मागील एका वर्षात कोरोनामुळे मृत्यू झाला नाही.

आता हे काय नवं संकट! ओमिक्रॉन कोरोनानंतर Florona ची दहशत; इथं सापडला पहिला रुग्ण

आपली मागणी पूर्ण होताच 31 डिसेंबरला गावातील लोकांनी सामूहिक मुंडण केलं. गावातील 100 हून अधिकांनी मुंडण केलं आणि यानंतर आनंदही साजरा करण्यात आला. याचा व्हिडिओ (Video Viral) समोर आला आहे.

First published:

Tags: Corona spread, Corona updates