नवी दिल्ली, 10 जानेवारी : कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना (Corona patient) कोरोना संसर्गाचा आणि तो इतरांमध्ये वेगाने पसरण्याचा धोका असतो. त्यामुळे कोरोना रुग्ण सापडला की त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जातो (People contacted with corona patient) आणि त्यांचीही कोरोना टेस्ट केली जाते (Corona test). पण आता याबाबत मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांची कोरोना टेस्ट करण्याची गरज नाही, असा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे (Corona test guidelines). ज्या व्यक्तींना कोरोनाचा जास्त धोका नाही, अशा व्यक्तींसाठी हा निर्णय आहे. जास्त धोका असलेल्या व्यक्ती म्हणजे ज्यांचं वय जास्त आहे, किंवा त्यांना इतर आजार आहे. हे वाचा - कोरोनाची लस मुलांसाठी सुरक्षित आहे का? ब्रिटनमधील अहवालाने वाढवली जगाची चिंता इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने कोरोना चाचणीबाबत नवी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. कोणत्या व्यक्तीची कोरोना टेस्ट कऱण्याची गरज नाही याची त्यांनी यादी दिली आहे. यामध्ये खालील लोकांचा समावेश आहे.
Advisory on Purposive Testing Strategy for COVID-19 in India (Version VII, dated 10th January 2022) @MoHFW_INDIA @DeptHealthRes @PIB_India @mygovindia @COVIDNewsByMIB #ICMRFIGHTSCOVID19 #IndiaFightsCOVID19 #CoronaUpdatesInIndia #COVID19 #Unite2FightCorona pic.twitter.com/0bFN4R5gZ4
— ICMR (@ICMRDELHI) January 10, 2022
- सार्वजनिक ठिकाणी राहणआरे लक्षणं नसलेले लोक 2) कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेले पण ज्यांना जास्त धोका नाही, म्हणजे ज्यांचं वय जास्त आहे. आजारी नाहीत असे लोक 3) होम आयसोलेशनच्या गाइडलाइन्सनुसार डिस्चार्ज मिळालेले लोक 4) रुग्णालयाच्या डिस्चार्ज पॉलिसीनुसार कोविड-19 केंद्रातून डिस्चार्ज मिळालेले लोक 5) एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करणारे नागरिक हे वाचा - ‘अखेर कोरोनाने गाठलचं’ ; बिग बॉस मराठीच्या या स्पर्धकाला झाला कोरोना सरकारने आता कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्यांचीही टेस्टिंग केली जाणार नसल्याचं म्हटलं आहे आणि तुम्ही एखाद्या कोरोना रुग्णाच्या संपर्कात आला असाल, त्यामुळे तुम्हालाही कोरोना झाला असावा अशी भीती वाटते आहे. तर घरच्या घरी तुम्ही कोरोना टेस्ट करू शकता. होम टेस्टिंगसाठी कोणकोणत्या कोरोना टेस्ट किट आहेत याची यादीही आयसीएमआरने दिली आहे.