Home /News /coronavirus-latest-news /

कोरोनाची लस मुलांसाठी सुरक्षित आहे का? ब्रिटनमधील अहवालाने वाढवली जगाची चिंता

कोरोनाची लस मुलांसाठी सुरक्षित आहे का? ब्रिटनमधील अहवालाने वाढवली जगाची चिंता

कोरोनाची लस मुलांसाठी (Covid vaccination in children) सुरक्षित आहे का? वास्तविक, हा प्रश्न उद्भवण्याचे कारण म्हणजे यूकेच्या एका संशोधनात असे दिसून आले आहे की लसीकरणानंतर अनेक प्रकरणांमध्ये मुलांमध्ये हृदयाच्या समस्या दिसून आल्या आहेत. चला सविस्तर जाणून घेऊ.

पुढे वाचा ...
    लंडन, 10 जानेवारी : जगभरातील मोठमोठ्या देशांमध्ये प्रौढ लोकांचे कोरोना लसीकरण (Covid vaccination) जवळपास पूर्ण होत आले आहे. यानंतर आता या देशांमध्ये किशोरवयीन आणि लहान वयोगटातील मुलांना कोरोना लस (Covid vaccination in children) दिली जात आहे. ओमिक्रॉनमुळे (Omicron variant) आलेल्या कोरोना लाटेपासून या मुलांचे संरक्षण व्हावे यासाठी या लसीकरणाला जलदगतीने पार पाडले जात आहे. भारतातही 15 ते 18 वर्षे वयोगटातील लहान मुलांचे लसीकरण (India children vaccination) सुरू झाले आहे. मात्र, या सगळ्यातच, ब्रिटनमधील एका रिपोर्टने लोकांची चिंता वाढवली आहे. लहान मुलांमध्ये कोरोना लसीकरणाचे दुष्परिणाम (Vaccination side effects in children) दिसून आल्याची कित्येक प्रकरणं ब्रिटनमध्ये समोर आली आहेत. या अहवालानुसार, कोरोना लस घेतल्यानंतर किशोरवयीन मुलांमध्ये हृदयासंबंधी (Covid vaccination side effect in children) त्रास दिसू लागले आहेत. यामध्ये हृदयाच्या मांसपेशींना सूज येणं, छातीत दुखणं आणि श्वास घेण्यास अडचण अशी लक्षणं दिसू लागली आहेत. या स्थितीला मायोकार्डिटिस (Myocarditis in children) म्हणतात. महिलांपेक्षा पुरुषांना याची लागण होण्याची शक्यता अधिक असते. ‘मिरर’मध्ये हा रिपोर्ट प्रसिद्ध झाला आहे. दरम्यान, भारतात तीन जानेवारी 2022 पासूनच लहान मुलांच्या लसीकरणाला (India children vaccination) सुरुवात करण्यात आली होती. यासाठी ओळख प्रमाणपत्र म्हणून दहावीची मार्कशीटही ग्राह्य (Children vaccination registration) असल्याची माहिती कोविन पोर्टलकडून (CoWin portal) देण्यात आली होती. तसेच, आजपासून (10 जानेवारी 22) देशातील आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि 60 वर्षांवरील नागरिकांना, तसेच जास्त गरज असलेल्या ज्येष्ठ रुग्णांना कोरोना लसीचा बूस्टर डोस (Booster dose in India) देण्यात येणार आहे. या लसीला ‘प्रिकॉशनरी डोस’ म्हटलं जात आहे. ओमिक्रॉन व्हेरियंटचा धोका वाढत असल्यामुळे हा डोस देण्यात येणार आहे. मुंबईत कोरोनाची तिसरी लाट कधी गाठणार उच्चांक? IIT च्या रिपोर्टमध्ये खुलासा दुसऱ्या डोसच्या तारखेपासून 9 महिने किंवा 39 आठवडे पूर्ण झाले असतील, तर तिसऱ्या डोससाठी ती व्यक्ती पात्र ठरणार आहे. सर्व नागरिकांचे सरकारी केंद्रांवर विनामूल्य लसीकरण (Booster dose rules) होणार आहे. खासगी केंद्रावर लस घ्यायची असल्यास, शासनाने निर्धारित केलेल्या किंमतीत लस घ्यावी लागेल, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. दरम्यान, बूस्टर डोससाठी मिक्स अँड मॅच टेक्निक (Vaccination mix n match) वापरणार नसल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे. म्हणजेच, पहिले दोन डोस ज्या कोरोना लसीचे घेतले आहेत, बूस्टर डोसही त्याच लसीचा घ्यावा लागणार आहे. कोरोनामुक्त झालेल्या 92 पैकी 56 विद्यार्थिंनींना Omicronची लागण, सांगलीत खळबळ बूस्टर डोससाठी ऑनलाईन आणि नोंदणी पद्धतीने सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच, 60 वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील नागरिकांना बूस्टर डोससाठी कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र दाखवण्याची गरज नाही. मात्र. त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच डोस घ्यावा असे स्पष्ट करण्यात आले आहे.
    First published:

    Tags: Corona vaccination, Corona vaccine, Omicron

    पुढील बातम्या