मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

घरी कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णांना किडनी निकामी होण्याचा धोका 23% जास्त, रिसर्चमधून माहिती समोर

घरी कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णांना किडनी निकामी होण्याचा धोका 23% जास्त, रिसर्चमधून माहिती समोर

कोरोना व्हायरस संदर्भातले अनेक रिसर्च समोर येत असतात. असाच एक रिसर्च आताही समोर आला आहे. कोरोनातून बरे झालेले रुग्ण आता नव्या समस्येला सामोरे जात आहेत.

  • Published by:  Pooja Vichare

नवी दिल्ली, 03 सप्टेंबर: संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसनं (Corona Virus) थैमान घातलं आहे. नेहमी कोरोना व्हायरस संदर्भातले अनेक रिसर्च समोर येत असतात. असाच एक रिसर्च आताही समोर आला आहे. कोरोनातून बरे झालेले रुग्ण आता नव्या समस्येला सामोरे जात आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, अशा रुग्णांची किडनी खराब होत असल्याची बातमी आहे आणि एकदम शेवटच्या टप्प्यांत याचा उलगडा होत आहे. (Post COVID19 Kidney Failure)

एनबीटीच्या रिपोर्टमध्ये असं लिहिण्यात आलं आहे की, अशी प्रकरणे केवळ त्या रुग्णांमध्ये दिसत नाहीत ज्यांना कोविडच्या गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान ही समस्या त्या लोकांमध्ये देखील दिसून येत आहे जे रुग्ण होम आयसोलेशनमध्ये (Post COVID19) राहून कोविडपासून बरे झाले आहेत.

अहवालानुसार, अमेरिकन सोसायटी ऑफ नेफ्रोलॉजीच्या जर्नलमध्ये असे म्हटले आहे की, किडनीचा हा परिणाम अशा रुग्णांमध्येही दिसून आला आहे ज्यांना यापूर्वी किडनीची कोणतीही समस्या नव्हती. अशा रुग्णांमध्ये, कोविडपासून किडनी निकामी होण्याचा धोका दोन पटीने वाढला आहे.

 मुल्ला बरादर करणार अफगाणिस्तानमधील नव्या सरकारचं नेतृत्त्व: तालिबान सूत्र

किडनी आपल्या शरीरात असलेले रक्त फिल्टर करून स्वच्छ करते. अहवालात असा दावा करण्यात आला आहे की कोविडमधून बरे झालेल्या प्रत्येक 10 हजार लोकांपैकी 7.8 लोकांना डायलिसिस, किडनी प्रत्यारोपणाची गरज आहे.

वॉशिंग्टन विद्यापीठातील क्लिनिकल एपिडेमियोलॉजीचे संचालक झियाद अल-अली आणि त्यांच्या टीमने एप्रिलमध्ये उघड झालेल्या रुग्णांच्या डेटावर आधारित हा अहवाल तयार केला. या रिसर्चसाठी कोविडपासून बरे झालेल्या 89 हजारांहून अधिक लोकांची माहिती गोळा करण्यात आली.

IND vs ENG: टीम इंडियाच्या बॉलर्सचा इंग्लंडमध्ये जलवा, 89 वर्षांमधील BEST कामगिरीची नोंद

किडनी तज्ज्ञ एल-अली म्हटलं की, किडनीच्या बाबतीत सर्वात चिंताजनक गोष्ट म्हणजे शरीरातील किडनी खराब होत असते आणि रुग्णाला त्याची कल्पना नसते. कोणतीही वेदना दिसून येत नाही आणि कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. आम्हाला रिसर्चमध्ये आढळून आलं की, घरी ठिक झालेले कोविडच्या रुग्णांमध्ये 6 महिन्यांच्या आत किडनी निकामी होण्याचा धोका 23 टक्क्यानं वाढत जातो.

First published:

Tags: Coronavirus, Kidney sell