ओव्हल, 3 स्पटेंबर : टीम इंडियाचे (Team India) बॅट्समन सलग दुसऱ्या टेस्टमध्ये फेल गेले. ओव्हल टेस्टमध्ये (India vs England 4th Test) भारताची पहिली इनिंग 191 रनवरच संपुष्टात आला. तिसऱ्या टेस्टमध्ये भारतीय टीम 78 रनवर ऑल आऊट झाली होती. या खराब कामगिरीनंतरही टीम इंडियाच्या बॉलर्सनी टेस्टमध्ये रंगत निर्माण केली आहे. त्यांनी पहिल्या दिवशी इंग्लंडच्या तीन विकेट्स घेतल्या. यामध्ये कॅप्टन जो रूटच्या (Joe Root) महत्त्वपूर्ण विकेट्सचाही समावेश आहे. या संपूर्ण सीरिजमध्ये भारतीय बॉलर्सनी सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्यांचा स्ट्राईक रेट 55 आहे. हे भारतीय टीमनं इंग्लंडमध्ये आजवर खेळलेल्या टेस्ट सीरिजमधील सर्वोच्च प्रदर्शन आहे. भारतीय बॉलर्सच्या याच कामगिरीमुळे ही सीरिज सध्या 1-1 नं बरोबरीत आहे. चौथ्या टेस्टमध्ये भारतीय बॅट्समननं फक्त 61.3 ओव्हर बॅटींग केली. पण त्यानंतर जसप्रीत बुमराहनं (Jasprit Bumrah) 2 तर उमेश यादवनं 1 विकेट घेत भारतीय टीमच्या आशा जिवंत ठेवल्या. या सीरिजमध्ये भारतीय बॉलर्सचा स्ट्राईक रेट हा 55.4 असून इकॉनॉमी रेट 3 पेक्षा कमी आहे. तसंच त्यांनी 27 च्या सरासरीनं 52 विकेट्स घेतल्या आहेत. 35 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला यापूर्वी भारतीय बॉलर्सनी 1986 साली इंग्लंडमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली होती. त्यावेळी त्यांनी 57.2 च्या स्ट्राईक रेटनं 58 विकेट्स घेतल्या होत्या. टीम इंडियानं ती सीरिज 2-0 नं जिंकली होती. भारतीय क्रिकेट टीमला 2007 नंतर इंग्लंडमध्ये एकही टेस्ट सीरिज जिंकता आलेली नाही. त्यानंतरच्या सलग तीन टेस्टमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. यापूर्वी 2018 मध्ये झालेल्या सीरिजमध्ये टीमचा 1-4 नं मोठा पराभव झाला होता. इंग्लंडमध्ये दोन्ही देशात खेळली जाणारी ही 19 वी टेस्ट सीरिज आहे. यामध्ये फक्त 7 वेळा भारतीय बॉलर्सना 50 पेक्षा जास्च विकेट्स घेता आल्या आहेत. टीम इंडियाला या सीरिजमध्ये आणखी 37 विकेट्स घेण्याची संधी आहे. या सीरिजमधील पहिली टेस्ट ड्रॉ झाली होती. दुसरी टेस्ट टीम इंडियानं तर तिसरी टेस्ट इंग्लंडनं जिंकली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.