Home /News /coronavirus-latest-news /

पतंजलीच्या औषधाला राज्यात मान्यता नाही, खोट्या जाहिरातींपासून सावधान – अमित देशमुख

पतंजलीच्या औषधाला राज्यात मान्यता नाही, खोट्या जाहिरातींपासून सावधान – अमित देशमुख

पतंलजीच्याऔषधावरून देशभर वादळ उठलं असून केंद्रीय आयुष मंत्रालयानेही त्याच्या जाहिरातीवर बंदी घातली आहे.

    उस्मानाबाद 26 जून: पतंजलीने ( Patanjali) कोरोनावर (Corona) काढलेल्या औषधाचा वाद अजुन संपलेला नाही. पतंजलीच्या औषधाला अधिकृत मान्यता नाही त्यामुळे नागरिकांनी त्यांच्या खोट्या जाहीरातींना बळी पडू नये असं मत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी सांगितलं. ते म्हणाले या औषधाला अजुन मान्यता मिळालेली नाही. त्याचा अभ्यास केला जात आहे. औषधाच्या खोट्या जाहिरातींपासून सावध राहा. या औषधाची विक्रीही राज्यात करता येणार नाही असंही त्यांनी सांगितलं. उस्मानाबाद दौऱ्यावर आलेल्या अमित देशमुख यांनी आज जिल्ह्यातल्या अधिऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली. या औषधावरून देशभर वादळ उठलं असून केंद्रीय आयुष मंत्रालयानेही त्याच्या जाहीरातीवर बंदी घातली आहे. दरम्यान, वाढत्या रुग्णसंख्येवर आता तंत्रज्ञानाव्दारे नजर ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पिंपरी चिंचवडमध्येही रुग्णांची संख्या वाढली असून चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे यापुढे शहरातील हॉटस्पॉटवर ड्रोनने नजर ठेवली जाणार आहे. पिंपरी चिंचवड शहरातील हॉटस्पॉटवर आता ड्रोनद्वारे नजर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर शहरातील इतर सार्वजनिक ठिकाणीही ड्रोन फिरणार असून लोकांवर नजर ठेवली जाणार आहे, असं पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. तानाशहा! तुकाराम मुंढेंनी मौखिक आदेशवर थांबवली 81 कोटींची कामे, भाजपचा आरोप नागरिक नियमांचं पालन करत नसल्याचे आढळून आल्यास तो परिसर तीन दिवसांसाठी सील केला जाणार असल्याचंही श्रावण हर्डीकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, अनलॉक-1 ची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सर्वच शहरांमधील लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली जात आहे. यामुळे नागरिकांना बाहेर पडणं शक्य होतं आहे. मात्र त्याचवेळी आता पुणे, पिंपरी-चिंचवड या भागातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. VIDEO: कोरोनावरून ‘मनसे’चा औरंगाबादमध्ये राडा, उपायुक्तांना खुर्ची फेकून मारली वारंवार सांगूनही बाजारपेठेमध्ये सोशल डिस्टन्सिंग आणि सम विषम पद्धतीने दुकाने सुरू ठेवण्यासाठी घालून दिलेल्या नियमांचं पालन होत नसल्याने आता अखेर पुढील 3 दिवसांसाठी शहरातील मुख्य बाजारपेठ पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकारी आणि सहायक आयुक्त स्मिता झगडे यांनी याबाबतचा आदेश काढला आहे. संपादन - अजय कौटिकवार
    First published:

    Tags: Amit deshmukh, Coronavirus, Patanjali

    पुढील बातम्या