औरंगाबाद 26 जून: औरंगाबाद शहरात (Aurngbad City) वाढत असलेल्या कोरोना रुग्णाच्या (Covid-19) संख्येवरून मनसेने (Mmaharashtra navnirman sena) आज आक्रमक पवित्रा घेत महापालिका कार्यालयातच (Aurangabad municipal corporation) राडा केला. दिवसेंदिवस शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आणि बाधित रुग्णांच्या मृत्यूचा आकडाही वाढत आहे. या सगळ्यांमध्ये महापालिका आणि प्रशासन कुचकामी ठरल्याचा आरोप मनसेने केला आहे. आता महापालिका आयुक्तच क्वारंटाइन झाले आहेत. त्यामुळे उपयुक्त रवींद्र निकम यांच्याकडे सूत्रे आहेत. मनसेचे नेते सुहास दशरते यांनी प्रशासनाला जाब विचारला मात्र समाधान कारक उत्तर मिळाले नसल्याने त्यांनी उपयुक्त निकम यांच्यावर खुर्ची फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षा रक्षकांनी खुर्ची धरल्याने पुढील अनर्थ टळला. दशरते हे महापालिका मुख्यालयात गेले आणि निकम यांच्या केबिनमध्ये जात त्यांनी त्यांच्याशी वाद घातला. मात्र नंतर त्यांचा पारा चढला आणि त्यांनी खुर्चीच फेकून मारण्याचा प्रयत्न केला.
कोरोनावरून ‘मनसे’चा औरंगाबदमध्ये राडा, उपायुक्तांना खुर्ची फेकून मारण्याचा प्रयत्न.
— News18Lokmat (@News18lokmat) June 26, 2020
मनसे नेते सुहास दशरते यांनी प्रशासनाला कोरोना उपचारावरून जाब विचारला मात्र समाधान कारक उत्तर मिळाले नसल्याने त्यांनी उपयुक्त निकम यांना खुर्ची फेकून मारण्याचा प्रयत्न केला. pic.twitter.com/rA8lskYU82
दरम्यान, कोरोना रुग्णांसाठी (corona patient) प्लाझ्मा थेरेपी (Plasma Therapy) आता आशेचा किरण ठरताना दिसत आहे. कोरोनाची लागण झालेले दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र कुमार जैन यांच्यावर प्लाझ्मा थेरेपी यशस्वी होताना दिसली. आता इतर कोरोना रुग्णांवरही या थेरेपीचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (cm kejriwal) यांनी कोरोना रुग्णांवरील प्लाझ्मा थेरेपीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. कोरोनामुळे मृत्युमूखी पडलेल्या 75 टक्के रुग्णांची धक्कादायक माहिती समोर प्लाझ्मा थेरेपीमुळे कोरोना रुग्णांचा मृत्यूचा दर 50 टक्के कमी झाला आहे. मात्र ही थेरेपी मॉडरेट रुग्ण म्हणजे मध्यम स्वरूपाची लक्षणं असलेल्या रुग्णांवरच परिणामकारक ठरत आहे, अशी माहिती केजरीवाल यांनी शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फ्रेसिंगद्वारे प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. संपादन- अजय कौटिकवार