नवी दिल्ली 02 जून: देशभरात कोरोनाची दुसरी लाट (2nd Wave of Corona) ओसरत असतानाच ब्लॅक फंगसनं (Black Fungus) आता चिंतेत भर घातली आहे. अशात, रामदेव बाबा (Baba Ramdev) आणि त्यांचे निकटवर्ती आचार्य बाळकृष्ण यांनी एका आठवड्याच्या आत फंगसवर आयुर्वेदिक औषध लॉन्च करणार असल्याचा दावा केला आहे. त्यांनी असाही दावा केला आहे, की पतंजली आयुर्वेद लिमिटेड आणि पतंजली योगपीठातील या औषधासंदर्भातील काम आणि आवश्यक औपचारिकता जवळजवळ पूर्ण झाल्या आहेत. ब्लॅक, व्हाइट आणि येलो फंगससाठी तयार करण्यात आलेल्या या औषधाचं शेवटच्या टप्प्यातील काम सुरू आहे. बाबा रामदेव म्हणाले, की सध्या सुरू असलेल्या विवादामध्येही त्यांनी लोकांच्या सेवेसाठी काम सुरुच ठेवलं आणि माघार घेतली नाही. कोरोना काळात ब्लॅक फंगससोबत इतरही अनेक फंगल इन्फेशनची प्रकरणं वाढली आणि घातकही झाली. रामदेव बाबांनी असं म्हटलं, की याच गंभीर इन्फेक्शनविरोधात लढण्यासाठी पतंजली रिसर्च सेंटरनं औषध निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. एका वृत्तानुसार, यासाठी बालकृष्ण यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केंद्र प्रमुख डॉ. अनुराग वार्ष्णे यांच्या नेतृत्वात एक संशोधन पथक तयार करण्यात आले. आयकर भरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 7 जूनला लाँच होणार नवीन Income Tax पोर्टल या फंगल इन्फेन्शनविरोधात लढण्यासाठी विकसित केलेल्या औषधासाठी रिसर्च करणाऱ्या टीमचं रामदेव बाबा यांनी कौतुक केलं. पुढे रामदेव यांनी असा दावा केला, की या पथकाने केवळ पाच ते सहा आठवड्यांत औषध बनवण्याचे काम साध्य केले. त्याचवेळी, बालकृष्ण म्हणाले की या औषधाशी संबंधित संशोधन पूर्ण झाले आहे आणि आता त्याला मंजुरी मिळावी यासाठीची औपचारिकता शासन स्तरावर पूर्ण केली जात आहे. त्यांच्या मते, यासाठी एक ते दीड आठवडे लागू शकतात. या संबंधी दोन गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत. पहिली ही, की पतंजलिनं कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान कोरोनिल हे औषध बाजारात आणलं होतं. यावेळी कोरोनावर प्रभावी उपचार असा दावा त्यांनी केला होता. मात्र, नंतर यावरुन वाद होण्याची चिन्हं दिसताच त्यांनी याला सपोर्टिंग मेडिलिन किंवा इम्यूनिटी बूस्टर असं नाव दिलं. दुसरी गोष्ट अशी, की बालकृष्ण यांनी एका मुलाखतीत असंही म्हटलं होतं, की पतंजलिमध्ये 500 हून अधिक शास्त्रज्ञांचं टीम आहे. जी सतत नवनवे संसोधन करत असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.