मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /GOOD NEWS : कोरोना लसीचं अंतिम ट्रायल; यशस्वी झाल्यास याच वर्षात येणार लस

GOOD NEWS : कोरोना लसीचं अंतिम ट्रायल; यशस्वी झाल्यास याच वर्षात येणार लस

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची कोरोना लस (oxford university corona vaccine) क्लिनिकल ट्रायलच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची कोरोना लस (oxford university corona vaccine) क्लिनिकल ट्रायलच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची कोरोना लस (oxford university corona vaccine) क्लिनिकल ट्रायलच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे.

  लंडन, 25 जून : जगभरात कोरोनाव्हायरस थैमान घालतो आहे. या व्हायरसने आतापर्यंत एकूण 4 लाख 80 हजार लोकांचा जीव घेतला आहे, तर जवळपास 95 लाखांपेक्षा जास्त लोकं याच्या विळख्यात आहेत. जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनावरील लस विकसित करण्यात झुटलेत आणि आता ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची (oxford university) लस (corona vaccine) क्लिनिकल ट्रायलच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. यामध्ये लस कितपत परिणामकारक आहे, हे समजणार आहे.

  हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार  युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्‍सफर्ड आणि AstraZeneca Plc यांची ChAdOx1 nCoV-19 ही लस क्लिनिकल ट्रायलच्या शेवटच्या टप्प्यात आहे. भारतातील सिरम इन्स्टिट्युटचीही या लसीच भागीदारी आहे.  ब्रिटनमध्ये पुढील टप्प्यात 10,260 वयस्कर आणि लहान मुलांना ही लस दिली जाणार आहे. जर चाचणी यशस्वी झाली तर याच वर्षाच्या अखेरपर्यंत ऑक्सफर्ड ही लस लाँच करू शकतं. ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेतही या लसीचं परीक्षण सुरू झालं आहे.

  हे वाचा - देशात कोरोनाच्या विक्रमी वाढीनंतर आली दिलासादायक बातमी; वाचा सविस्तर रिपोर्ट

  ऑक्सफर्डचे प्रमुख प्रोफेसर एंड्रयू पोलार्ड यांनी सांगितलं, क्लिनिकल ट्रायलचे खूप सकारात्मक परिणाम मिळत आहेत. आता आम्ही वयस्कर व्यक्तींवर याचा काय परिणाम होतो ते तपासणार आहोत.

  जगभरात 140 पेक्षा जास्त लसींवर काम सुरू आहे. त्यापैकी 13 लसी क्लिनिकल ट्रायलच्या टप्प्यात आहेत. तर इतर लसी अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहेत.

  हे वाचा - Fair & Lovely तून 'फेअर' होणार गायब; 45 वर्षांनी कंपनीने घेतला मोठा निर्णय

  दरम्यान या वर्षाच्या अखेरपर्यंत कोरोनावरील लस तयार होईल, असं जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन (Dr. soumya swaminathan) यांनी सांगितल्याचं वृत्त पीटीआयने दिलं आहे.

  डॉ. स्वामीनाथन म्हणाल्या, "जवळपास 10 कंपन्यांच्या लसीची मानवी चाचणी सुरू आहे आणि त्यापैकी कमीत कमी तीन कंपन्यांच्या लस अशा टप्प्यापर्यंत पोहोचल्या आहेत, जिथं लसीचा प्रभाव किती आणि कसा आहे हे स्पष्ट होईल"

  "लस विकसित करणं ही खूप गुंतागुंतीची प्रक्रिया आहे आणि त्याबाबत अनिश्चिततादेखील आहे. मात्र आपल्याकडे अनेक कंपन्या लस तयार करत आहे, ही एक चांगली बाब आहे. आपलं नशीब असेल तर या वर्षाच्या अखेरपर्यंत एक किंवा दोन कंपन्या तरी प्रभावी लस तयार करण्यात यशश्वी होतील, अशी मला आशा आहे", असं त्या म्हणाल्या.

  संकलन, संपादन - प्रिया लाड

  First published:

  Tags: Corona vaccine, Coronavirus, Oxford