नवी दिल्ली, 25 जून : गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मुंबई, दिल्ली यांसारख्या भागात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे वृत्त आपण पाहत आलो आहोत. आज सकाळच्या आकडेवारीनुसार देशात आज कोरोनाची विक्रमी वाढ झाली आहे. आज 24 तासांत तब्बल 16000 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. ही आतापर्यंतची सर्वाधिक वाढ आहे. त्यातच आता दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशभरात कोरोनाचा रिकवरी रेट 57.43 पर्यंत पोहोचला असून यावरुन कोरोना आटोक्यात येत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे गेल्या 24 तासांत 13,012 रुग्ण बरे झाल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत देशातील 2,71,696 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. शिवाय रिकवरी रेटही 57.43 टक्क्यांपर्यंत पोहोचल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने जारी केली आहे. रिकवरी रेट वाढत असता तरी कोरोना रुग्णांची संख्याही वाढत असल्याचे समोर येत आहे.
During the last 24 hours, a total of 13,012 #COVID19 patients have been cured. So far, a total of 2,71,696 patients have been cured of COVID19. The recovery rate is 57.43%: Ministry of Health pic.twitter.com/lncBdKXaU1
— ANI (@ANI) June 25, 2020
दुसरीकडे महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 38 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना योद्धांना कोविडची लागण होत असल्याने लोकांमधील व व्यवस्थापनामधील चिंता वाढली आहे. महाराष्ट्रातील कालच्या बातमीनुसार 24 तासात 4000 रुग्ण बरे झाले आहेत. त्याशिवाय रिकवरी रेटही सुधारत असल्याचे सांगितले जात आहे. हे वाचा- धक्कादायक: कोरोनामुळे 12 कोटी मुलांना दोन वेळचं जेवणही मिळणे होणार अवघड महाराष्ट्रात आतापर्यंत 73 हजार 792 रुग्ण बरे झाले आहेत. मुंबई मंडळातील मुंबई मनपा, ठाणे, पालघर, रायगड या चार जिल्ह्यात आज 3530 रुग्ण घरी सोडण्यात आले. राज्यात मुंबई मंडळात आतापर्यंत 50 हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. संकलन, संपादन - मीनल गांगुर्डे