मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /कोरोनाविरोधात प्रोटिनयुक्त औषध; क्लिनिकल ट्रायल यशस्वी झाल्याचा कंपनीचा दावा

कोरोनाविरोधात प्रोटिनयुक्त औषध; क्लिनिकल ट्रायल यशस्वी झाल्याचा कंपनीचा दावा

रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोना रुग्णांवर (corona patient) या औषधाचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळाल्याचं कंपनीने सांगितलं.

रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोना रुग्णांवर (corona patient) या औषधाचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळाल्याचं कंपनीने सांगितलं.

रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोना रुग्णांवर (corona patient) या औषधाचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळाल्याचं कंपनीने सांगितलं.

लंडन, 20 जुलै : कोरोनाव्हायरसवर (coronavirus) सध्या कोणतंही प्रभावी औषध नाही. आधीपासून उपलब्ध असलेल्या औषधांचं ट्रायल केलं जातं आहे. शिवाय लशींच्याही चाचणी सुरू आहेत. अशा यूकेतील एका औषध कंपनीने आता कोरोनाव्हायरसविरोधात प्रोटिनयुक्त असं औषध तयार केलं आहे. या औषधाचं क्लिनिकल ट्रायल यशस्वी झाल्याचा दावाही कंपनीने केली आहे.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, यूकेतील साइनरजेन कंपनीने (Synairgen Plc) एसएनजी001 (SNG001) हे एक औषध तयार केलं आहे. यामध्ये इंटरफेरॉन बिटा नावाचं प्रोटिन (interferon beta protein) आहे. जेव्हा व्हायरल इन्फेक्शन होतं, तेव्हा शरीरात नैसर्गिकरित्या या प्रोटिनची निर्मिती होते. नेबुलाइझरच्या माध्यमातून हे प्रोटिन असलेलं एसएनजी001 फॉर्म्युलेशन कोरोना रुग्णांच्या फुफ्फुसात टाकता येऊ शकतो, असं कंपनीने सांगितलं.

साइनरजेन कंपनीने रुग्णालयात दाखल असलेल्या 100 पेक्षा अधिक रुग्णांवर या औषधाचं क्लिनिक ट्रायल घेतले आणि या ट्रायलचे परिणाम सकारात्मक आल्याचं कंपनीने सांगितलं आहे.

हे वाचा - ‘कोरोना’वर भारतात आणखी एका कंपनीने लाँच केलं औषध, किंमतही आहे कमी

प्लेसोबो आणि SNG001 दिलेल्या रुग्णांची तुलना करण्यात आली

SNG001 दिलेल्या रुग्णांना गंभीर समस्या उद्भवण्याचा धोका 79%  कमी झाला

श्वास घ्यायला त्रास होणं हे कोरोनाचं एक मुख्य लक्षण आहे आणि  SNG001 घेतलेल्या रुग्णांमध्ये ही समस्या कमी होत असल्याचं दिसून आलं.

रुग्णांचा रुग्णालयात दाखल राहण्याचा कालावधीदेखील कमी झाला.

ज्या रुग्णांना हे औषध देण्यात आलं आहे, त्यापैकी कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. मात्र ज्यांना प्लेसोबो देण्यात आलं अशा तिघांचा मृत्यू झाला.

हे वाचा - किशोरवयीन मुलांमुळे कोरोनाचा प्रसार होतोय जलद, शास्त्रज्ञांचा चिंताजनक दावा

बीबीसीशी बोलताना या ट्रायलचे प्रमुख शास्त्रज्ञ टॉम विल्किनसॉन यांनी सांगितलं, "हा अभ्यास छोट्या स्तरावर करण्यात आला आहे मात्र त्याचे रुग्णांवर होणारे परिणाम खूपच चांगले पाहायला मिळाले आहेत.  जर व्यापक स्तरावरी अभ्यासातही असाच परिणाम पाहायला मिळाला तर हा नवा उपचार गेम चेंजर ठरू शकतो"

तर साइनरजेनचे सीईओ रिचर्ड मार्सडेन म्हणाले, "रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांवर या उपचाराचा यशस्वी परिणाम पाहायला मिळाला आहे. आपण यापेक्षा अधिक चांगल्या परिणामाची अपेक्षा करू शकत नाही"

First published:
top videos

    Tags: Coronavirus