मराठी बातम्या /बातम्या /पुणे /पुण्यात कोरोनाचा उद्रेक, जुलैअखेर बाधितांची संख्या जाणार 40 हजारांवर

पुण्यात कोरोनाचा उद्रेक, जुलैअखेर बाधितांची संख्या जाणार 40 हजारांवर

पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासामध्ये तब्बल1251 रूग्णांची वाढ झाली आहे. यात पुणे मनपा क्षेत्रात 860 , पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रात 282 रुग्ण आढळून आले आहेत.

पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासामध्ये तब्बल1251 रूग्णांची वाढ झाली आहे. यात पुणे मनपा क्षेत्रात 860 , पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रात 282 रुग्ण आढळून आले आहेत.

पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासामध्ये तब्बल1251 रूग्णांची वाढ झाली आहे. यात पुणे मनपा क्षेत्रात 860 , पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रात 282 रुग्ण आढळून आले आहेत.

  पुणे 2 जुलै: पुण्यात कोरोना बाधितांची संख्या (Corona patients in Pune) दिवसेंदिवस वाढतच आहे. हा उद्रेक आता आणखी वाढण्याची शक्यता आहे. Unlock सुरू असल्याने गर्दी वाढली आहे. व्यवहार सुरू होत आहेत. त्यामुळे बाधितांची संख्याही वाढत आहे. पुण्यात टेस्टिंग (Covid-19 Test)वाढवल्याने जुलै महिन्याअखेर कोरोना बाधितांचा आकडा 40 हजारांचा टप्पा ओलांडू शकतो आणि त्यापैकी 18 हजार पेशंट्स हे Activeअसू शकतात, अशी माहिती पुणे मनपाचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी 'न्यूज18 लोकमत'ला दिली.

  पालिकेकडे तज्ज्ञ डॉक्टर्स उपलब्ध नसल्याने मनपाकडे उपलब्ध असलेले व्हेंटिलेटरर्स आता ससून हॉस्पिटलला दिले जाणार असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे. तसंच पुण्यात तुर्तास पुन्हा लॉकडाऊनचा कोणताही विचार नसल्याचा खुलासाही आयुक्तांनी केला. यासोबतच लक्षणं नसलेल्या कोरोना पेशंट्सनी विनाकारण बेड्स अडवून ठेऊ नयेत, असंही आवाहन पालिका आयुक्तांनी केलं आहे.

  पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासामध्ये  तब्बल1251 रूग्णांची वाढ झाली आहे. यात पुणे मनपा क्षेत्रात 860 , पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रात 282, पुणे ग्रामीण हद्दीत 64 तर कॅन्टॉनमेंट परिसरात 45 नवे रूग्ण आढळून आले आहेत. एकाच दिवसात झालेली ही जिल्ह्यातील सर्वाधिक वाढ आहे.

  गंभीर बाब म्हणजे, एकाच दिवसात 25 जणांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे मृत्यूदर कमी करण्याचे लक्ष ठेवल्यानंतर प्रशासनाला ना मृत्यूदर कमी करता येत आहे ना रूग्णसंख्या. त्यामुळे पुण्यात परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत चालली आहे.

  पुणेकरांना असं वाचवणार का? पुणे महापालिकेच्या कारभाराबद्दल धक्कादायक माहिती उघड

  दरम्यान, पुण्यात याआधी 74 कोरोना प्रतिबंधित झोन होते. त्यापैकी 15 मायक्रोझोन कोरोनामुक्त झाले होते. नवीन आदेशातून या 15 मायक्रोझोनची नावं वगळली आहे. तर गेल्या 15 दिवसांत तब्बल 50 नवे झोन कोरोनाबाधित बनले आहे.

  सरकारी नियमांना केराची टोपली, राष्ट्रवादीच्या नेत्याची जंगी मिरवणूक

  9 मायक्रोझोनची फेरचना केल्याने पुणे शहरात आता 109 मायक्रोझोन तयार झालं  असून त्याचे एकूण क्षेत्रफळ 6.69 स्वेअर किलोमीटर इतके असणार आहे.

   

   

   

   

  First published:
  top videos

   Tags: Coronavirus, Pune (City/Town/Village)