नवी दिल्ली 04 मे : जगभरात अनेक ठिकाणी कोरोनाच्या लसीबाबत (Corona Vaccine) अभ्यास करत आहेत. या अभ्यासातून अनेक नवनवीन गोष्ट समोर येत आहेत. आतापर्यंत असंच समजलं जात आहे, की कोरोनाविरोधातील अँटीबॉडी (Antibodies) बनवण्यासाठी लसीचे दोन्ही डोस (Two Dose of Vaccine) घेणं गरजेचं आहे. मात्र, आता एका अभ्यासांती नवीन गोष्ट समोर आली आहे. यातून असं समोर आलं आहे, की ज्या लोकांना आधीच कोरोना होऊन गेला आहे, त्यांच्यासाठी लसीचा एक डोसही पुरेसा आहे. अशी लोकांच्या बाबतीत कोरोना लसीचा एक डोसही त्यांना या विषाणूविरोधात लढण्यासाठी मदत करतो. हा अभ्यास लंडनच्या इम्पीरियल कॉलेज, क्वीन मॅरी युनिर्व्हसिटी आणि युनिर्व्हसिटी कॉलेजच्या शास्त्रज्ञांनी मिळून केला आहे. हा रिसर्च एका सायन्स जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे. यात असा दावा करण्यात आला आहे, की जे लोक आधीच कोरोनाबाधित झाले होते, त्यांच्या शरिरात लसीचा एक डोस घेतल्यानंतरच पुरेशा अँटीबॉडीज आढळल्या आहेत. शास्त्रज्ञांनी हा अभ्यास दक्षिण आफ्रिकी व्हेरियंटवर केला होता. त्यांना अशी आशा आहे, की हीच बाब ब्राझील (P.1) तसंच भारतीय (B.1.617) आणि (B.1.618) या व्हेरियंटच्या बाबतीतही लागू असेल. या अभ्यासासाठी शास्त्रज्ञांनी फायजर-बायोएनटेक लसीचा वापर केला आहे. या स्टडीमध्ये असं समोर आलं, की जे लोक आधीच कोरोनाबाधित झाले होते किंवा ज्यांच्यामध्ये कोरोनाची हलकी किंवा काहीच लक्षणंही नव्हती, अशा लोकांना लसीचा एक डोसही पुरेसा आहे. मात्र, ज्या लोकांना आधी कोरोना झाला नाही, त्यांच्या शरिरामध्ये एका डोसनंतरही प्रतिकारशक्ती कमी होती आणि त्यांना कोरोना होण्याचा धोकाही अधिक होता. Beed News : कोविड सेंटरमधून बाहेर पडणे रुग्णांना पडले महागात, अखेर गुन्हा दाखल इम्पीरियल कॉलेजचे प्रोफेसर रोजमेर बॉयटन यांनी सांगितलं, की आमच्या अभ्यासात असं समोर आलं आहे, की ज्या लोकांना लसीचा एकच डोस मिळाला आहे आणि याआधी त्यांना कोरोना झालेला नाही, अशा लोकांमध्ये नवीन स्ट्रेनचा प्रादुर्भाव होण्याचा धोका आहे. ते म्हणाले, की याच कारणामुळे लोकांनी दोन्ही डोस घेणं गरजेचं आहे. ते पुढे म्हणाले, की नवनवीन स्ट्रेन समोर येत आहेत. अशात अधिकाधिक लोकांना लस देणं गरजेचं आहे. अशा परिस्थितीमध्ये ज्या लोकांना आधीच कोरोना झाला आहे, त्यांना लसीचा एकच डोस दिल्यासही त्याचा फायदा होऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.