Home /News /pune /

पुणेकरांना दिलासा, त्या Omicron पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील 25 जणांचे रिपोर्ट आले समोर

पुणेकरांना दिलासा, त्या Omicron पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील 25 जणांचे रिपोर्ट आले समोर

पुणे  शहरामध्ये ओमायक्रॉनचा (Omicron cases in Pune) पहिला रुग्ण आढळला आहे. पुण्यात पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.

पुणे शहरामध्ये ओमायक्रॉनचा (Omicron cases in Pune) पहिला रुग्ण आढळला आहे. पुण्यात पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.

पुणे शहरामध्ये ओमायक्रॉनचा (Omicron cases in Pune) पहिला रुग्ण आढळला आहे. पुण्यात पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.

पुणे, 06 डिसेंबर : कोरोनाचा (corona) घातक व्हेरिएंट ओमायक्रॉनमुळे (Omicron)  जगभरात खळबळ उडाला आहे. महाराष्ट्रात (omicron 10 patients in maharashtra) सुद्धा ओमायक्रॉनचे 10 रुग्ण आढळले आहे. पुण्यात ओमायक्रॉन बाधित  (omicron patients ) 1 रुग्ण आढळला आहे. पण, सुदैवाने या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 25 जणांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे पुणेकरांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. पुणे  शहरामध्ये ओमायक्रॉनचा (Omicron cases in Pune) पहिला रुग्ण आढळला आहे. पुण्यात पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या ओमायक्रॉन पॉजिटिव्ह रूग्णाच्या संपर्कात आलेल्या 25 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. या सर्वांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. पुणे शहरात 438 नागरिक परदेशातून नुकतेच परतले असून त्यापैकी 370 नागरिक मनपा हद्दीतील आहेत. 370 पैकी 335 नागरिकांपर्यंत पोहोचण्यात यश आलं आहे. आतापर्यंत 267 नागरिकांची RT-PCR चाचणी करण्यात आली असून सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पुणे महानगरपालिकेने सर्व खबरदारी घेतली आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं, आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे. दरम्यान, मुंबईमध्ये २ रुग्ण आढळून आले आहे. तर राज्यात एकूण रुग्णांची संख्या १० वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईकरांना जास्त खबरदारी घेण्याची सूचना आरोग्य विभागाने केली आहे. ख्रिसमसदिवशी असं काही घडेल की संपूर्ण जग हादरेल; टाइम ट्रॅव्हलरचा धक्कादायक दावा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील ओमायक्रॅान रूग्णांची संख्या १० वर पोहोचली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत रुग्ण आढळून नये अशी प्रार्थना केली जात होती, पण अखेरीस मुंबईत दोन जणांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचे समोर आले आहे. जोहान्सबर्गहून मुंबईला आलेल्या 37 वर्षीय तरुण 25 नोव्हेंबर रोजी मुंबईत आला होता. त्याच्यासोबत त्याची अमेरिकेतील महिला मैत्रिणही होती. तिलाही ओमिक्रॉनची लागण झाल्याचे आढळून आले. दोघांनी फायझरची लस घेतली आहे. Video : 'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेत आणखी एक ट्विस्ट आणि लीप सध्या दोघांनाही कोणतीही लक्षणे नाहीत. दोघांवर सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दोघांच्या संपर्कात आलेले 5 हायरिस्क व्यक्ती  आणि 315 कमी जोखमीचे संपर्क ओळखले आहेत. तर याआधीच  डोंबिवलीमध्ये ०१, पिंपरी चिंचवडमध्ये ०६, पुण्यामध्ये ०१ रुग्ण आढळून आला आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या