Home /News /coronavirus-latest-news /

Omicronचा मुकाबला करण्यासाठी या गोष्टी आहेत महत्त्वाच्या; 'WHO'च्या मार्गदर्शक सूचनांचे करा पालन

Omicronचा मुकाबला करण्यासाठी या गोष्टी आहेत महत्त्वाच्या; 'WHO'च्या मार्गदर्शक सूचनांचे करा पालन

strong immunity and omicron: ज्या लोकांना यापूर्वी कोविड-19 ची लागण झाली आहे, त्यांना ओमिक्रॉन प्रकाराने संसर्ग होण्याचा धोका जास्त आहे. लोकांमध्ये ओमिक्रॉन प्रकाराबद्दल भीतीचे वातावरण आहे

    नवी दिल्ली, 06 डिसेंबर : कोरोना विषाणूचा ओमिक्रॉन (omicron) हा प्रकार आता सर्व जगभरात चिंतेचा विषय बनला आहे. मात्र, अद्याप हा विषाणू प्रकार इतर डेल्टा सारख्या प्रकारांपेक्षा वेगाने संक्रमित होतो की नाही याबाबत खात्रीशीर माहिती मिळालेली नाही. डब्ल्यूएचओकडून प्रारंभिक मूल्यांकनावर आधारित असे सांगण्यात आले आहे की, ओमिक्रॉन प्रकारात पुन्हा संसर्ग होण्याची अधिक क्षमता आहे. याचा अर्थ असा की ज्या लोकांना यापूर्वी कोविड-19 ची लागण झाली आहे, त्यांना ओमिक्रॉन प्रकाराने संसर्ग होण्याचा धोका जास्त आहे. लोकांमध्ये ओमिक्रॉन प्रकाराबद्दल भीतीचे वातावरण आहे, त्यामुळे पुन्हा एकदा लोकांना प्रतिकारशक्ती मजबूत राखण्यावर भर द्यावा (strong immunity and omicron) लागणार आहे. कोविडचे असे नवीन प्रकार किंवा उत्परिवर्तन समोर येत राहतील तोपर्यंत लोकांच्या मनात भीती राहील. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत Omicron प्रकाराची कोणतीही धोकादायक लक्षणे किंवा काहींना अचानक जास्त त्रास झाल्याची नोंद नाही. तसेच आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती दीर्घकाळात अशा नवीन प्रकारांविरुद्ध कसे कार्य करेल याचा देखील कोणताही पुरावा नाही. अशा स्थितीत, कोरोना विषाणूच्या नव-नवीन प्रकारांशी लढण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली राखणे गरजेचे आहे. हे वाचा - Omicron corona variant: भारतात वेगानं पसरतोय ओमिक्रॉन; 5 राज्यात आढळले 21 रुग्ण आयुशक्तीच्या सहसंस्थापक डॉ. स्मिता नरम यांनी हिंदुस्तान टाईम्सला सांगितले की, कोरोना विषाणूच्या नवीन प्रकारांशी लढण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती अधिक चांगली असणे आवश्यक आहे. ते म्हणाले की यावर एक संभाव्य उपाय म्हणजे बदलती परिस्थिती पाहता, लोकांनी त्यांच्या शारीरिक बदलांबद्दल जागरूक असले पाहिजे आणि त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवली पाहिजे. हे वाचा - Health Tips : या वेळात स्प्राउट्स खाणे त्रासदायक ठरू शकते, जाणून घ्या योग्य पद्धत कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचा उत्तम मार्ग डब्ल्यूएचओकडून दिलेल्या मार्गदर्शत सूचनांनुसार, सार्वजनिक नियमांचे योग्य पालन करणे गरजेचे आहे. मास्क योग्य प्रकारे लावणे, हाताच्या स्वच्छतेची काळजी घेणे, शारीरिक अंतर राखणे, या गोष्टींची काळजी घेतल्यास त्यांना कोणत्याही प्रकारच्या कोरोनाचा धोका खूप कमी असतो. डब्ल्यूएचओने देखील सल्ला दिला आहे की, लोकांनी पुरेशा वेंटिलेशनसह घरातच रहावे, तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. डब्ल्यूएचओने म्हटले आहे की प्रत्येक व्यक्तीने लस घेणे आवश्यक आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Corona, Corona vaccination, Coronavirus

    पुढील बातम्या