मराठी बातम्या /बातम्या /देश /

Omicron Update: बूस्टर डोस ओमायक्रॉन विरुद्ध प्रभावी; 'या' दोन लसी देतात कमी संरक्षण, अभ्यासातून माहिती समोर

Omicron Update: बूस्टर डोस ओमायक्रॉन विरुद्ध प्रभावी; 'या' दोन लसी देतात कमी संरक्षण, अभ्यासातून माहिती समोर

Omicron व्हेरिएंटपासून बचाव करण्यासाठी प्रत्येक देश बूस्टर डोसबाबत विचार करत आहेत.

  • Published by:  Pooja Vichare

लंडन, 11 डिसेंबर: कोरोना व्हायरसचा (Corona virus)नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंट (Omicron variant)नं जगभरात दहशत पसरली आहे. Omicron व्हेरिएंटपासून बचाव करण्यासाठी प्रत्येक देश बूस्टर डोसबाबत विचार करत आहेत. कोविड-19 (Anti Covid-19 Vaccine) लसीचा तिसरा बूस्टर डोस (Booster Dose) कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) ओमायक्रॉन (Omicron Variant)व्हेरिएंटमुळे होणाऱ्या संसर्गाच्या बाबतीत 70 ते 75 टक्के संरक्षण प्रदान करते. ब्रिटनच्या हेल्थ प्रोटेक्शन एजन्सीनं (UKHSA) शुक्रवारी ही माहिती दिली.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने देखील कोरोना व्हायरसच्या नवीन व्हेरिएंटबद्दल चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान तज्ज्ञांनी लस, मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि लसीकरण सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असल्याचं म्हटलं आहे.

हेही वाचा-  25 वर्षांची नोकरी, 30 लाखांच्या साड्या; विश्वासघाताची ही कहाणी ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

नवीनतम तांत्रिक माहिती देताना, एजन्सीनं सांगितलं की ऑक्सफर्ड/अॅस्ट्राझेनेका - भारतात Covishield या नावाने आणि Pfizer/Biontech लसींच्या दोन डोसमध्ये सध्या सर्वाधिक प्रसारित कोविडच्या डेल्टा स्वरूपाच्या तुलनेत लक्षणात्मक संसर्गामध्ये "अत्यंत कमी संरक्षण" आहे. दरम्यान असे आढळून आलं आहे की, तिसरा डोस व्हायरसच्या नवीन स्वरूपाविरूद्ध प्रतिकारशक्ती मजबूत करतो. हा अभ्यास Omicron च्या 581 प्रकरणांच्या विश्लेषणावर आधारित आहे.

UKHSA नं सांगितलं की, सध्याचा ट्रेंड बदलला नाही तर या महिन्याच्या अखेरीस ब्रिटनमध्ये बाधितांची संख्या दहा लाखांच्या पुढे जाईल. एजन्सीनं सांगितलं की, लसीच्या परिणामकारकतेशी संबंधित प्राथमिक डेटा सूचित करतो की बूस्टर डोस हा व्हायरसच्या नवीन स्वरूपाच्या विरूद्ध प्रारंभिक टप्प्यात अधिक प्रभावी आहे आणि सुमारे 70 ते 75 टक्के लक्षणात्मक संक्रमणांमध्ये संरक्षण प्रदान करते.

सर्व मूल्यांकनांमध्ये अनिश्चितता आहे कारण ते व्हायरसच्या स्वरूपाच्या प्राथमिक अभ्यासावर आधारित आहेत.

इस्रायलमधील आणखी एका अभ्यासात असं म्हटलं आहे की, फायझरच्या अँटी-कोविड-19 लसीचा तिसरा डोस कोरोना व्हायरसच्या डेल्टा फॉर्मपासून मृत्यू दर 90 टक्क्यांपर्यंत कमी करू शकतो.

हेही वाचा- फुटबॉलर डिएगो माराडोना यांचं हरवलेलं घड्याळ सापडलं, भारतातून एकाला अटक

'द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन'मध्ये गुरुवारी प्रकाशित झालेल्या संशोधन अहवालात म्हटलं आहे की, या अभ्यासात 50 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांचा समावेश आहे ज्यांना किमान पाच महिन्यांपूर्वी फायझर लसीचे दोन डोस मिळाले होते.

अभ्यासात सहभागी 8,43,208 लोकांचा दोन गटांमध्ये समावेश करण्यात आला होता. या गटांपैकी एकामध्ये अभ्यासादरम्यान बूस्टर डोस मिळालेल्या लोकांचा समावेश होता तर दुसऱ्या गटात बूस्टर डोस न मिळालेल्या लोकांचा समावेश होता. या दोन गटांच्या अभ्यासाच्या परिणामांची एकमेकांशी तुलना करण्यात आली.

क्लॅलिट हेल्थ सर्व्हिस आणि इस्रायलच्या बेन-गुरियन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी सांगितले की, अभ्यासात असे दिसून आले आहे की फायझरच्या अँटी-कोविड-19 लसीचा बूस्टर (तिसरा) डोस कोरोना व्हायरसच्या डेल्टा स्वरूपातील मृत्यू 90 टक्क्यांपर्यंत कमी करू शकतो.

First published:

Tags: Corona vaccination, Corona vaccine