मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

ना लस ना औषध, आता 'या' Antibodies कोरोनाचा कायमचा खात्मा करणार; शास्त्रज्ञांचा दावा

ना लस ना औषध, आता 'या' Antibodies कोरोनाचा कायमचा खात्मा करणार; शास्त्रज्ञांचा दावा

जगभरातील शास्त्रज्ञ आणि संशोधक कोरोनासारख्या आजारापासून बचाव करणाऱ्या लसीच्या शोधात आहेत. अद्याप कोणत्याही कोरोनावरील लस शोधता आली नाही आहे.

जगभरातील शास्त्रज्ञ आणि संशोधक कोरोनासारख्या आजारापासून बचाव करणाऱ्या लसीच्या शोधात आहेत. अद्याप कोणत्याही कोरोनावरील लस शोधता आली नाही आहे.

जगभरातील शास्त्रज्ञ आणि संशोधक कोरोनासारख्या आजारापासून बचाव करणाऱ्या लसीच्या शोधात आहेत. अद्याप कोणत्याही कोरोनावरील लस शोधता आली नाही आहे.

  • Published by:  Priyanka Gawde
वॉशिंग्टन, 07 नोव्हेंबर : जगभरातील कोरोनाबाधितांची (Coronavirus) संख्या कमी होत असली तरी कोरोनावर कायमचा उपाय उद्याप मिळाला नाही आहे. जगभरातील शास्त्रज्ञ आणि संशोधक कोरोनासारख्या आजारापासून बचाव करणाऱ्या लसीच्या शोधात आहेत. अद्याप कोणत्याही कोरोनावरील लस शोधता आली नाही आहे. मात्र एका अभ्यासात असे आढळले आहे की इनहेलेबल लामा अँटीबॉडीज (inhalable llama antibodies) कोरोनापासून बचाव करण्यासाठी मदत करू शकतात. 6 नोव्हेंबर रोजी अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे शास्त्रज्ञांनी लामापासून लहान मात्र शक्तीशाली अँटीबॉडीज काढण्याची नवीन पद्धत शोधली. शास्त्रज्ञांच्या मते, ते म्हणतात की COVID-19 ला प्रतिबंधित आणि उपचार करण्याच्या क्षमतासोबत हे अँटीबॉडीज वापरले जाऊ शकतात. अमेरिकेतील पिट्सबर्ग युनिव्हर्सिटीच्या (स्कूल ऑफ मेडिसिन) संशोधकांच्या म्हणण्यानुसार, विशेष लामा अँटीबॉडीज ज्यांना नॅनोबॉडीज म्हटले जाते. हे मानवी अँटीबॉडीजपेक्षा लहान असतात. त्यांनी सांगितले की, SARS-CoV-2 वर मात करण्यासाठी हे अॅँटीबॉडीत प्रभावी आहेत. वाचा-अलर्ट! कोरोना विषाणुंच्या लक्षणांमध्ये बदल; या देशात 1.7 कोटी उंदीर मारणार संशोधकांनी वॅली नावाच्या काळ्या लामाला SARS-CoV-2 स्पाइक प्रोटीनच्या तुकड्यासोबत मिक्स केले, दोन महिन्यांनंतर त्या प्राण्यांच्या रोगप्रतिकारक शक्तीने व्हायरसविरूद्ध परिपक्व नॅनोबॉडी तयार केल्या. वाचा-'आम्हाला लस हवीच'; Corona Vaccine टोचून घेण्यासाठी जगात भारतीय सगळ्यात उत्सुक प्रयोगशाळेत संशोधन सहाय्यक युफेई झियांग यांनी मास स्पेक्ट्रोमेट्री-आधारित तंत्रज्ञानाचा वापर करुन वॅलीच्या रक्तात नॅनोबॉडीज शोधून काढले जे SARS-CoV-2 ला सर्वात मजबुतीनं जोडतात. त्यानंतर वैज्ञानिकांनी SARS-CoV-2 व्हायरसला सक्रिय करण्यासाठी नॅनोबॉडीजना अॅक्टिव्ह केले. यावेळी त्यांना असे दिसले की, नॅनोग्रामचा एक अंश दहा लाख पेशींना संक्रमित होण्यापासून वाचवण्यासाठी पुरेसा आहे. SARS-CoV-2 हा एक श्वसनासंबंधित व्हायरस आहे. नॅनोबॉडीज श्वसन प्रणालीमध्ये या व्हायरसचा शोध घेऊ शकतात आणि नुकसान होण्यापूर्वीच व्हायरसला नष्ट करू शकतात. मुख्य म्हणजे या नॅनोबॉडीज अगदी कमी खर्चात उपलब्ध होऊ शकतात.
First published:

Tags: Corona, Coronavirus, Coronavirus symptoms

पुढील बातम्या