कोपेनहेगन, 6 नोव्हेंबर : कोरोना व्हायरस संसर्ग दररोज आपलं स्वरूप बदलत आहे आणि विषाणूमधील झालेलं हे म्यूटेशन, वॅक्सिन प्रोग्रॅमसाठी एक मोठं आव्हान ठरत आहे. प्राण्यांमध्ये कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे झालेल्या बदलांमुळे डेन्मार्क 1.7 कोटी उंदीर मारण्याची योजना तयार करत आहे. माणसांमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरल्यानंतर आता तिथल्या सरकारने उंदीर मारण्याचा निर्णय घेतला आहे.
रॉयटर्सनुसार, पंतप्रधान मेटे फ्रेडरिकसेन यांनी गुरुवारी सांगितलं की आरोग्य अधिकाऱ्यांना मनुष्य आणि उंदरांमध्ये कोरोना व्हायरसची काही लक्षणं आढळली आहेत. फ्रेडरिकसेन म्हणाले की आमच्या देशातील नागरिकांच्या जीविताची मोठी जबाबदारी आमच्यावर आहे पण आता कोरोना व्हायरसमध्ये झालेल्या बदलांमुळे आमच्यावर बाकीच्या जगाचीही मोठी जबाबदारी आली आहे. डेन्मार्कमधील संसर्गजन्य आजारांसंबंधी काम करणाऱ्या संस्थेने प्रयोगशाळेतील प्रयोगांच्या आधारे काढलेले निष्कर्ष जागतिक आरोग्य संघटना आणि युरोपियन सेंटर फॉर डिसिज प्रिव्हेंशन अँड कंट्रोल या संस्थांशी शेअर केले आहेत.
WHO ने तपास सुरू केला
WHOशी संबंधित माईक रायन म्हणाले की माणसांना पूर्णपणे शास्त्रीय तपासणीसाठी बोलावलं गेलं होतं. हा व्हायरस चीनमध्ये कोरोना संक्रमित उंदरांपासून मनुष्यांमध्ये संक्रमित झाला होता. तेव्हाच, WHOच्या एका अधिकाऱ्याने जिनिव्हामध्ये म्हटलं होतं की, आम्हाला डेन्मार्कमध्ये उंदीरांपासून कोरोनो व्हायरसची लागण झालेले अनेक लोक आढळले आहेत ज्यांच्यात कोरेना व्हायरसमध्ये काही अनुवांशिक बदल दिसले. त्यामुळे डॅनिश अधिकारी या निष्कर्षांच्या व्हायरलॉजिकल तपासण्या करत आहेत.
हे ही वाचा-मेड इन इंडिया कोरोना लशीबाबत खूशखबर; मोदी सरकार COVAXIN लाँच करण्याच्या तयारीत
डेन्मार्कच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, नवीन व्हायरसची 5 प्रकरणं मिंक फार्ममध्ये आणि 12 मनुष्यांमध्ये आढळली आहेत आणि देशात 15 ते 17 दशलक्ष उंदीर आहेत. आरहस विद्यापीठाच्या व्हेटर्नरी अँड वाइल्डलाइफ मेडिसिनचे प्राध्यापक क्रिश्चियन सोन यांनी एका ईमेलमध्ये म्हटलं आहे की, खबरदारी म्हणून आता उंदरांना ठार करणं हे भविष्यातील उद्रेक रोखण्यासाठी एक चांगला निर्णय आहे. नाहीतर उंदरांच्या माध्यमातून कोरोना पसरला तर त्यांना नियंत्रित करणं अतिशय कठीण होईल. कोणतीही उपाययोजना नंतर करण्यापेक्षा आधीच आव्हानांचा अंदाज बांधून उपाययोजना केलेली फायद्याचं ठरतं. त्यामुळेच जागतिक स्तरावर वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत. लस आली तर कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवणं शक्य होईल.