'आम्हाला लस हवीच'; Corona Vaccine टोचून घेण्यासाठी जगात भारतीय सगळ्यात उत्सुक

'आम्हाला लस हवीच'; Corona Vaccine टोचून घेण्यासाठी जगात भारतीय सगळ्यात उत्सुक

जगभरात इतरत्र कोरोना लस (Covid Vaccine) टोचून घेण्यात नागरिकांनी फारसा रस दाखवलेला नाही. काही देशांत तर दर 10 व्यक्तींपैकी 1 व्यक्ती लसीकरणाच्या विरोधात आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 6 नोव्हेंबर :  जगभर कोरोनाने (Coronavirus) थैमान घातलं आहे. युरोपात तर या साथीची दुसरी लाट आल्याने पुन्हा एकदा देशव्यापी Lockdown करण्याची वेळ आली आहे. भारतातली शहरं आता कुठे खुली होऊ लागली आहेत. त्यामुळे Covid-19 लशीची सर्वात आतुरतेने वाट पाहणारे आहेत भारतीय.  काही देशांतल्या नागरिकांनी कोरोना लस टोचून घेण्यात फारसा रस दाखवलेला नाही. काही देशांत तर दर 10 व्यक्तींपैकी 1 व्यक्ती लसीकरणाच्या विरोधात आहे. ही बाब एका जागतिक सर्वेक्षणात पुढे आली आहे. मागील काही दिवसांपासून भारतात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. परंतु जगभरात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात भारतीय लसीकरणाच्या बाबतीत खूपच आशादायी असल्याचं सामोर आले आहे. जगभरातील 15 देशांपैकी 10 देशातील नागरिकांनी कोरोना लस आल्यानंतर लसीकरणात रस दाखवला आहे.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या सर्व्हेनुसार (Word Economic Survey) 15 देशातील 7 टक्के नागरिक कोरोनाची लस घेणार आहेत. 15 देशांमधील 18,526 नागरिकांचे सर्वेक्षण कारण्यात आले असून ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत 77 टक्क्यांनी घट दिसून आली आहे. आता केवळ 73 टक्के लोकच लसीकणाबाबत आशादायी आहेत.  भारतात मात्र अजूनही 87 टक्के नागरिकांनी लसीकरणात रस दाखवला आहे. तर चीन, ऑस्ट्रेलिया, स्पेन आणि ब्राझील या देशांमधील नागरिकांमध्ये यासंदर्भात निरुत्साही असल्याचं दिसून आलं आहे.

का नकोय लस?

लसीकरणातील रस कमी होण्यामध्ये दोन गोष्टी कारणीभूत आहेत. यामध्ये या लसीचे साईड इफेक्ट आणि सध्या सुरू असलेल्या मेडिकल चाचण्यांविषयी (Trials) साशंकता ही मोठी कारणं आहेत.  34 टक्के नागरिकांनी साईड इफेक्टची चिंता व्यक्त केली आहे तर 16 टक्के नागरिकांनी या चाचणीच्या योग्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तर जगभरातील या सर्वेक्षणात भाग घेतलेल्या दर 10 व्यक्तींपैकी 1 व्यक्ती लसीकरणाच्या विरोधात आहे. भारतात याची टक्केवारी 19 टक्के आहे. तर 10 टक्के नागरिकांनी लसीकरण प्रभावी होऊ शकत नसल्याचे म्हटले आहे. तर 8 टक्के नागरिकांनी कोरोना होण्याची भीती नसल्याचे म्हटले आहे.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने म्हटले की,जगभरात विविध कंपन्या लस बनवण्याचे काम करत आहे. परंतु तरीदेखील नागरिकांमध्ये लस घेण्यावरून अनिश्चितता आहे. त्यामुळे भविष्यकाळासाठी विविध उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत जगतिक आरोग्य संघटना आणि गेवी आणि सीईपीआय या संघटनांनी व्यक्त केले आहे.

WEF च्या फ्यूचर ऑफ हेल्थ अँड हेल्थकेअरचे शेपिंग हेड प्रमुख अरनॉड बर्नर्ट म्हणाले,  "आपण लस तयार करण्याच्या इतक्या जवळ असताना लशीसंदर्भात विश्वास कमी होणं खूप चिंताजनक आहे." सध्या तयार होत असलेल्या लशींची संख्या कोरोनाला नष्ट करण्यासाठी आणि लॉकडाऊन मधून बाहेर पडण्यासाठी पुरेसे असल्याचा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. खासगी संस्था आणि सरकार एकत्र येऊन यासंदर्भात विश्वास निर्माण करणे कठीण आहे. परंतु  ही  लस बाजारात आल्यानंतर परिस्तिथी बदलण्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर या सर्वेक्षणात लस लगेच कशी मिळणार हा प्रश्नदेखील उपस्थित करण्यात आला.

'लस आल्यानंतर तीन महिन्यांनी घेऊ'

जगभरातील निम्म्या ज्येष्ठ नागरिकांनी आपण लस बाजारात आल्यानंतर तीन महिन्यांत लसीकरण करणार असल्याचे म्हटले आहे. भारतात ही टक्केवारी 54 टक्के आहे. तर जगभरातील 72 टक्के नागरिकांनी आपण वर्षभरात लसीकरण करून घेणार असल्याचे म्हटले आहे.

जगभरातील नागरिकांचे कोणत्याही आजाराप्रती दुर्लक्ष हे 10 प्रमुख कारणांमधील एक कारण असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. यामुळे केवळ नागरिकांनाच फटका बसत नाही तर व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेला देखील याचा फटका बसत आहे. 8 ते 13 ऑकटोबर दरम्यान महत्त्वाची मार्केट रिसर्च कंपनी इप्सोसने केला होता. यामध्ये अमेरिका, कॅनडा, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इटली, जपान, मेक्सिको, दक्षिण कोरिया, स्पेन आणि यूकेमधील 18,526 नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. भारतीय कोरोनाच्या लसीबाबत आशादायी असून या सर्व्हेमध्ये  दुसऱ्या क्रमांकावर आहे. यामध्ये 34 टक्के भारतीय नागरिक तीन महिन्यांत कोरोनाची लस मिळण्याबाबत आशादायी आहे तर 72 टक्के नागरिक सहा महिन्यांत लस येण्याबाबत आशादायी आहे. या सर्व्हेत चीन टॉपला असून 37 टक्के  नागरिक तीन महिन्यांत कोरोनाची लस मिळण्याबाबत आशादायी आहे तर 75 टक्के नागरिक सहा महिन्यांत लस येण्याबाबत आशादायी आहे. तर जगभरात 16 टक्के  नागरिक तीन महिन्यांत कोरोनाची लस मिळण्याबाबत आशादायी आहे तर 45 टक्के नागरिक सहा महिन्यांत लस येण्याबाबत आशादायी आहे.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: November 6, 2020, 10:15 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading