कोविशिल्ड कशी ठरतेय 'संजीवनी'? आदर पूनावाला यांनी सांगितलं कोरोना लशीचं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्यं

कोविशिल्ड कशी ठरतेय 'संजीवनी'? आदर पूनावाला यांनी सांगितलं कोरोना लशीचं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्यं

Sanjeevani- A Shot of Life : भारतात सध्या जी कोरोना लस दिली जात आहे, त्यापैकी एक म्हणजे कोविशिल्ड. पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कंपनीने तयार केलेली ही लस. या कंपनीचे सीईओ आदर पूनावाला या लशीबाबत काय म्हणालेत पाहा.

  • Share this:

पुणे, 07 एप्रिल  : देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशानं नेटवर्क 18 (Network 18) आणि फेडरल बँक (Federal Bank) यांनी संयुक्तपणे ‘संजीवनी-अ शॉट ऑफ लाईफ’ (Sanjeevani-A Shot of Life) हा विशेष उपक्रम सुरू केला आहे. जागतिक आरोग्य दिनाचे (World Health Day) औचित्य साधून आज पंजाबमधील ऐतिहासिक अटारी सीमेवर (Attari Border) या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. याबाबत ‘सीएनएन-न्यूज 18’ने (CNN-News 18) पुण्यातील लस निर्मिती कंपनी सीरम इन्स्टीट्यूटचे (Serum Institute) मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला (Adar Poonawala) यांच्याशी संवाद साधला. या वेळी आदर पूनावाला यांनी त्यांच्या कंपनीनं निर्माण केलेल्या लशीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगितलं.

कोव्हिशिल्ड लशीचा (Covishield) डोस घेणाऱ्या लोकांना त्याचा बूस्टर डोस (Booster Dose) घेण्याची गरज नाही, असा दावा आदर पूनावाला यांनी केला.

काही महिन्यांपूर्वी या लशीचा संबंध न्यूरोलॉजिकल समस्यांशी जोडला जात होता आणि आता रक्ताच्या गुठळ्या बनत असल्याचं म्हटलं जात आहे. याबाबत विचारलं असता आदर पूनावाला म्हणाले की, वेगवेगळ्या देशांची आरोग्य मंत्रालयं, जागतिक आरोग्य संघटनेतर्फे याबाबत संशोधन करत आहेत, मी स्वतः देखील याचा शोध घेत आहे. इतर लशींचे बूस्टर डोस घेण्याची गरज भासत आहे. पण आमच्या लशीचा बूस्टर डोस घेण्याची गरज नाही, असं पूनावाला यांनी स्पष्ट केलं.

हे वाचा - आता तुमच्या ऑफिसमध्येच तुम्हाला मिळणार कोरोना लस; मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय

याबाबतच ‘सीएनएन-न्यूज 18’वरील (CNN-News 18) एका कार्यक्रमात पॉलिटिकल एडीटर मारिया शकील यांच्याशी नीती आयोगाचे (NITI Aayog) उपाध्यक्ष अमिताभ कांत (Amitabh Kant) यांनीही संवाद साधला. ते म्हणाले, "मी लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत. मला दोन्ही वेळेला कळलंही नाही इतक्या सहजपणे लस टोचण्यात आली. लशीचे डोस घेतल्यानंतर मला कोणताही त्रास झाला नाही. सर्वांनी ही लस घेतली पाहिजे.

हे वाचा - कोरोना लस ठरतेय संजीवनी, Sanjeevaniच्या लाँचवेळी आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

"सध्या देशात कोरोनाची दुसरी लाट अतिशय वेगानं पसरत आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने कोरोना सुरक्षा नियमांचे पालन करणं अत्यावश्यक आहे. देशातील एकूण कोरोना रुग्णांपैकी 90 टक्के संख्या 11 राज्यांमध्ये आहे. सर्वाधिक रुग्ण या राज्यांमध्ये आढळत आहेत. भारतानं स्वतः लस विकसित केली असून, मोठ्या प्रमाणात लस निर्मिती आपल्या देशात होत आहे", असं सांगून त्यांनी सर्वांना लस घेण्याचं आवाहन केलं.

First published: April 7, 2021, 7:10 PM IST

ताज्या बातम्या