मुंबई, 07 एप्रिल : तुम्ही ऑफिसला जाणारे कर्मचारी आहात आणि तुम्हाला कोरोना लस (Corona vaccination) घ्यायची असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी. तुम्हाला आता कोरोना लस घेण्यासाठी कोणत्याही खासगी किंवा सरकारी कोरोना सेंटरवर किंवा रुग्णालयात जाण्याची गरज नाही. तर तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्येच कोरोना लस मिळणार (Covid vaccination at workplaces) आहे. तुम्ही जिथं काम करता तिथेच लसीकरणाची सुविधा उपलब्ध होणआर आहे. वर्कप्लेसमध्ये कोरोना लसीकरण राबवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याबाबत अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. खासगी आणि सरकारी कार्यालयात कोरोना लसीकरण केलं जाणार आहे. 11 एप्रिल, 2021 पासून ही सेवा उपलब्ध करून दिली जाईल. यासाठी आवश्यक ती तयारी करण्याच्या सूचना केंद्राने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिल्या आहेत. हे वाचा - राज्यावर आणखी एक संकट, उद्यापर्यंत पुरेल इतकाच लशींचा साठा शिल्लक नियमानुसार 45 पेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना कोरोना लस दिली जाते आहे. त्यामुळे इथंसुद्धा याच निकषात बसणाऱ्या व्यक्तींना कोरोना लस मिळेल. ही लस फक्त संबंधित ऑफिसमधील कर्मचाऱ्यांनाच मिळेल. कर्मचाऱ्यांचे नातेवाईकांसह ऑफिसबाहेरील इतर कुणालाही ही लस मिळणार नाही, असं केंद्राने स्पष्ट केलं आहे. केंद्रीय आरोग्य सचिवांनी जारी केलेल्या या सूचनेनुसार एकावेळी फक्त 100 लोकांचं लसीकरण केलं जाईल. सध्या 45 पेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना कोरोना लस दिली जाते आहे. पण त्यापेक्षा कमी वयाच्या व्यक्तींचंही कोरोना लसीकरण करावं, अशी मागणी होत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींना याबाबत पत्र लिहिलं होतं. 25 पेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींसाठी कोरोना लस उपलब्ध करावी अशी मागणी केली होती. पण केंद्राने सर्वांसाठी लसीकरण सुरू करण्यास नकार दिला आहे. हे वाचा - कोरोना लस ठरतेय संजीवनी, Sanjeevaniच्या लाँचवेळी आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया सर्वांचं कोरोना लसीकरण करावं, यासाठी का परवानगी दिली जात नाही, हे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सांगितलं. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रकार परिषद घेत याचं कारण दिलं आहे. राजेश भूषण यांनी सांगितलं, “अनेक जण आम्हाला विचारत आहेत ही सर्वांना लसीकरण का केलं जात नाही आहे. याचं कारण म्हणजे या लसीकरण मोहिमेची दोन उद्दिष्ट आहेत. एक म्हणजे मृत्यूला रोखणं आणि दुसरं म्हणजे आरोग्य सेवा प्रणालीची सुरक्षा. याचा उद्देश असा की ज्यांना कोरोना लस हवी आहे, त्यांंना नाही तर ज्यांना आवश्यकता आहे त्यांना लस देणं आहे”
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.