Home /News /coronavirus-latest-news /

Covid-19 च्या लक्षणांत होताहेत बदल; ही नवी लक्षणं दिसली तर सावधान!

Covid-19 च्या लक्षणांत होताहेत बदल; ही नवी लक्षणं दिसली तर सावधान!

Coronavirus ची लागण झाल्यावक सर्दी, ताप, कोरडा खोकला या लक्षणांव्यतिरिक्त काही नवी लक्षणं आढळून येत आहेत. त्यामुळे या नव्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका..

 नवी दिल्ली, 6 सप्टेंबर : कोरोना विषाणू संसर्गाची (Coronavirus) लाट काहीशी आटोक्यात आल्यासारखं चित्र दिसत असलं, तरीही अद्याप ती पूर्णपणे संपलेली नाही. दररोज नवे कोरोनाबाधित सापडतच आहेत. शिवाय कोरोना विषाणूचे नवनवे व्हॅरिएंट्सही (New Variants of Coronavirus) तयार होत असल्यामुळे धोका वाढतच आहे. त्यातच आता कोरोनाच्या संसर्गाच्या लक्षणांमध्येही (Symptoms) बदल दिसून आल्याचं निरीक्षण नोंदवलं गेलं आहे. कोरोनाव्यतिरिक्त अन्य व्हायरल इन्फेक्शन्सही (Viral Infections) अनेकांना होत असल्याचं समोर आलं आहे. पूर्वी ताप, घशात खवखव, वाहणारं नाक आदी लक्षणं सर्दीची किंवा फ्लूसारख्या हंगामी आजारावेळी दिसायची. आता असं दिसून आलं आहे, ज्यांनी कोविडप्रतिबंधक लस घेतली आहे, त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यास ही लक्षणं दिसत आहेत. तुम्हाला Delta variant ची लागण तर झाली नाही ना? या लक्षणांवरून ओळखा कोरोनाच्या काही लक्षणांबद्दल आता जाणून घेऊ या. सर्वसामान्य लक्षणं : ताप (Fever), कोरडा खोकला, थकवा अन्य लक्षणं : अंगदुखी/वेदना, घशात खवखव, डायरिया (हगवण), डोळ्यांना त्रास होणं, डोकेदुखी, चव-वास न येणं गंभीर लक्षणं : श्वास घेण्यास त्रास होणं, छातीत दुखणं, बोलायला त्रास होणं कोरोनाची नवी लक्षणं : कमी ऐकू येणं, उलट्या येणं, बोटांचा रंग बदलणं, शरीरावर डाग किंवा चट्टे उठणं कोरोनाच्या इतर लक्षणांव्यतिरिक्त (Symptoms of Coronavirus) डेल्टा विषाणूची लागण झाल्यास काही इतर लक्षणंही (Additional symptoms in delta) दिसून येतात. यातील पहिलं लक्षण म्हणजे कान दुखणं. अमेरिकेतील फ्लोरिडा (Florida delta symptoms) शहरात असणाऱ्या कित्येक डेल्टा संक्रमित लोकांना कान दुखणं (Delta symptom ear pain) हे मुख्य लक्षण दिसून येत होतं. यासोबतच, डेल्टा व्हेरियंटच्या रुग्णांमध्ये घसा खवखवणं (Sore throat) हेदेखील लक्षण दिसून आल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. खरं तर, घशाच्या दुखण्यामुळेच कानांमध्ये त्रास होत असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं. दरम्यान, भारतात काल एका दिवसात कोविड-19चे 38,948 नवे रुग्ण आढळले. त्यामुळे देशातल्या आतापर्यंतच्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या तीन कोटी 30 लाख 27 हजार 621 एवढी झाली. आणखी 219 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने देशातल्या आतापर्यंत एकूण कोरोनामृतांची संख्या 4 लाख 40 हजार 752 एवढी झाली. गेल्या 167 दिवसांतला एका दिवसातला कोरोनामृतांचा हा सर्वांत कमी आकडा आहे. राज्याला तिसऱ्या लाटेतून दिलासा?, राज्य सरकारचा मेगाप्लॅन तयार तसंच, 48 दिवसांनी कोविड-19चा मृत्युदर घटून 1.33 टक्के झाला आहे. 23 मार्च रोजी देशात कोविड-19मुळे 199 जणांचा मृत्यू झाला होता. प्रतिबंध सर्वांत श्रेयस्कर शास्त्रज्ञ अविरतपणे संशोधन करून कोरोना विषाणूच्या संसर्गाचे विविध पैलू शोधून काढत आहेत, जेणेकरून त्याच्यापासून बचाव करणं सोपं होऊ शकेल. एखाद्या व्यक्तीला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला असेल, तर त्यांच्यापासून दुसऱ्या व्यक्तींना संसर्ग होण्याचा सर्वांत जास्त धोका त्या व्यक्तीला लक्षणं दिसण्याच्या दोन दिवस आधीपासून लक्षणं दिसू लागल्यानंतरच्या तीन दिवसांपर्यंत या पाच दिवसांमध्ये असतो, असं चीनमध्ये झालेल्या एका नव्या अभ्यासातून स्पष्ट झालं आहे. जामा इंटर्नल मेडिसिन (JAMA Internal Medicine) या जर्नलमध्ये या अभ्यासाबद्दलचा सविस्तर लेख प्रसिद्ध झाला आहे. लक्षणं न दिसणाऱ्या एखाद्या व्यक्तीकडून संसर्ग झालेल्या व्यक्तीही असिम्प्टमॅटिक (Asyptomatic) असण्याची, म्हणजेच त्यांच्यामध्येही लक्षणं न दिसण्याची शक्यता जास्त असते, असंही त्या संशोधनात आढळलं आहे. त्यामुळे या बाबी लक्षात घेऊन आपल्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवणं आणि काहीही बदल जाणवल्यास लगेच बाकीच्या व्यक्तींपासून विलग होऊन चाचणी करून घेणं आणि उपचार करून घेणं, हाच कोरोनाला दूर ठेवण्याचा प्रभावी मार्ग आहे.
First published:

Tags: Coronavirus, Covid-19, Symptoms of coronavirus

पुढील बातम्या