Home /News /coronavirus-latest-news /

तुम्हाला Delta variant ची लागण तर झाली नाही ना? या लक्षणांवरून ओळखा

तुम्हाला Delta variant ची लागण तर झाली नाही ना? या लक्षणांवरून ओळखा

डेल्टा विषाणूची लागण झाल्यास कोरोनाच्या मुख्य लक्षणांव्यतिरिक्त काही इतर लक्षणंही दिसून येतात.

मुंबई, 05 सप्टेंबर : कोरोना विषाणूची दुसरी लाट (Corona second wave) ज्यामुळे वेगाने पसरली, त्या कोविड-19 विषाणूच्या डेल्टा व्हेरिएंटची (Corona delta variant) बाधा झालेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. कोविड-19 च्या मूळ विषाणूपेक्षाही हा डेल्टा व्हेरियंट (Covid-19 delta variant) अधिक घातक असल्यामुळे याबाबत जास्त खबरदारी घेतली जात आहे. कित्येकांना कोरोना प्रतिबंधक लशींचे (Covid vaccine) दोन डोस घेतल्यानंतरही डेल्टाची लागण (Delta) होत असल्यामुळे लोकांमध्येही भीतीचं वातावरण आहे. यामुळेच डेल्टा व्हेरियंटची काही सुरुवातीची लक्षणं (Symptoms of Delta variant) वेळीच ओळखणं गरजेचं आहे. कोरोनाच्या इतर लक्षणांव्यतिरिक्त (Symptoms of Coronavirus) डेल्टा विषाणूची लागण झाल्यास काही इतर लक्षणंही (Additional symptoms in delta) दिसून येतात. यातील पहिलं लक्षण म्हणजे कान दुखणं. अमेरिकेतील फ्लोरिडा (Florida delta symptoms) शहरात असणाऱ्या कित्येक डेल्टा संक्रमित लोकांना कान दुखणं (Delta symptom ear pain) हे मुख्य लक्षण दिसून येत होतं. यासोबतच, डेल्टा व्हेरियंटच्या रुग्णांमध्ये घसा खवखवणं (Sore throat) हेदेखील लक्षण दिसून आल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. खरं तर, घशाच्या दुखण्यामुळेच कानांमध्ये त्रास होत असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं. हे वाचा - कोरोनापासून वाचण्यासाठी सर्वात प्रभावी मास्क कुठला? शास्त्रज्ञांनी शोधलं उत्तर डेल्टाची लागण झाल्यानंतर कित्येक रुग्णांना कॉमन कोल्ड, म्हणजेच सर्दी-प़डशाची लागण झाल्याचेही दिसून आले. पहिल्या कोरोनापेक्षाही (Coronavirus symptoms) डेल्टामध्ये याची तीव्रता अधिक असल्याचे संशोधकांनी म्हटलं आहे. यासोबतच COVID Symptom नावाच्या एका संशोधनामध्ये आणखी एक नवं लक्षण (New symptom in delta) दिसून आलं. तीन समूहांवर हे संशोधन करण्यात आलं होतं. यातील एका समूहातील लोकांनी कोरोना लस घेतली नव्हती, एका समूहातील लोकांनी लसीचा एकच डोस घेतला होता, तर तिसऱ्या समूहातील लोकांचे पूर्ण लसीकरण झाले होते. या तिन्ही समूहातील लोकांनी डोकेदुखी (Delta variant symptom) हे लक्षण जाणवल्याचं सांगितलं. विशेष म्हणजे, चव आणि वास जाणं ही कोरोनाच्या मूळ विषाणूची लक्षणं डेल्टाच्या रुग्णांना आजिबात जाणवली नाहीत. हे वाचा - कोरोनामधून घरी बरे झालेल्या रुग्णांना किडनीचा धोका अधिक: रिसर्च कोरोनाच्या मूळ विषाणूची लागण झालेल्या रुग्णांमध्ये दिसणारे कफचे (Cough in delta variant) लक्षण मात्र डेल्टाच्या रुग्णांमध्येही दिसून आले. सर्दीप्रमाणेच याची तीव्रताही अधिक असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. त्यामुळेच तुम्हालाही कोरोनाची लक्षणं (Delta symptoms) दिसून येत असतील, तर या इतर लक्षणांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. तुम्ही कोरोनाची लस घेतलेली असेल, तरीही वर दिलेल्या लक्षणांपैकी एकही लक्षण दिसून आल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
First published:

Tags: Coronavirus, Coronavirus symptoms, Delta virus, Symptoms of coronavirus

पुढील बातम्या