मुंबई, 05 सप्टेंबर: राज्यात कोरोनाची (Corona Virus) दुसरी लाट (Second Wave)आटोक्यात आल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेचा (Third Wave) धोका वर्तवण्यात आला आहे. कोरोनाची तिसरी लाट राज्यात येईल की नाही याबाबत सध्या काही स्पष्टपणे सांगता येणार नाही. मात्र चांगली बातमी म्हणजे कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेसाठी राज्य सरकारची (Maharashtra Government) तयारी पूर्ण झाली आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनावर मात करण्यासाठी राज्य सरकारने पायाभूत सुविधांमध्ये दीडपट सुधारणा केली आहे. यावर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान राज्यात मोठ्या संख्येनं लोक या साथीच्या कचाट्यात अडकले.
अधिकारी प्रदीप अवाटे यांनी टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राशी बोलले. बोलताना त्यांनी एक उदाहरण दिलं आहे. ते म्हणाले की, ज्या जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या लाटेमध्ये 100 प्रकरणे नोंदवली गेली आहेत, यावेळी त्या-त्या जिल्ह्यांमध्ये 150 खाटांची सोय करण्यात येत आहे. पुढे अवाटे म्हणाले की, डेल्टा प्रकारामुळे तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. मात्र त्यांच्या मते अनेक लोकांनी या व्हेरिएंटविरुद्ध इम्यूनिटी विकसित केली आहे.
फ्लाइट पकडण्यासाठी तरुणीचा कहर; केवळ Bikini घालून विमानतळावर मारली एन्ट्री, पाहा VIDEOमुंबई पालिकेचीही तयारीही पूर्ण
काही दिवसांपूर्वी तज्ज्ञांनी सांगितलं होतं की, कोविड-19 ची तिसरी लाट राज्यात आली तर 60 लाखांपर्यंत प्रकरणे नोंदवली जाऊ शकतात. बीएमसीनं म्हटलं आहे की, शहरातील आरोग्य पायाभूत सुविधा तयार ठेवण्यासाठी पालिका सर्व आवश्यक तयारी करत आहे.
भारतीयांनो, या देशात तुम्हांला Quarantine होण्याची गरज नाही
बेड आणि ऑक्सिजनच्या उपलब्धतेवर विशेषतः बीएमसीचा अधिक भर आहे. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले की, संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी 30,000 बेड तयार ठेवण्यात येतील. चेंबूर आणि महालक्ष्मीमध्येही ऑक्सिजन रिफिलिंग प्लांट बसवले जातील जेणेकरून शहरात जीवनावश्यक ऑक्सिजनची कमतरता भासू नये.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.