• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • Break the Chainची नवी नियमावली; पुण्यासह या 11 जिल्ह्यात कोरोनाचे निर्बंध कायम

Break the Chainची नवी नियमावली; पुण्यासह या 11 जिल्ह्यात कोरोनाचे निर्बंध कायम

हे 11 जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे.

 • Share this:
  मुंबई, 2 ऑगस्ट : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती असल्यामुळे अद्यापही महाराष्ट्रात पूर्णत: लॉकडाऊन हटविण्यात आलेला नाही. दरम्यान 2 ऑगस्ट रोजी राज्य सरकारने ब्रेक द चेन (new rules of Break the Chain ) अंतर्गत नवी नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीअंतर्गत राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये निर्बंध जैसे थे (Corona restrictions remain in place in these 11 districts including Pune) ठेवण्यात येणार असून इतर जिल्ह्यांना मात्र काही प्रमाणात शिथिलता अनुभवता येणार आहे. काही दिवसांपूर्वी केरळमध्ये कोरोनाची मोठी रुग्णसंख्या समोर आल्यानंतर इतर राज्यांना सावधान राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. याशिवाय यंदाही सण-उत्सव साजरा करताना निर्बंध असणार आहे. या 11 जिल्ह्यांतील निर्बंध कायम 1 कोल्हापूर 2 सांगली 3 सातारा 4 पुणे 5 पालघर 6 सोलापूर 7 रत्नागिरीत 8 बीड 9 रायगड 10 अहमदनगर 11 सिंधूदूर्ग हे ही वाचा-गणपती- दिवाळी यंदाही कोरोनाच्या सावटाखाली; ऑक्टोबरमध्ये असेल भयंकर स्थिती इतर जिल्ह्यात मात्र काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. काय आहेत नवे नियम - सोमवार ते शुक्रवारपर्यंत रात्री 8 वाजेपर्यंत सर्व दुकानं खुली ठेवण्यास परवानगी. शनिवार दुपारी ३ पर्यंत सर्व दुकाने खुली राहणार (माॅल्स ही खुले राहणार, पण रविवारी सर्व बंद) - रविवारी फक्त अत्यावश्यक सेवेतील दुकाने राहणार सुरू - सर्व खासगी आणि शासकीय कार्यालयं ही संपूर्ण क्षमतेने खुली राहणार, पण गर्दीच्या ठिकाणी नियमावली पाळावे लागतील. - सर्व उद्यानं- बगीचे खुले, याशिवाय मैदानातही खेळता येणार - ब्युटी पार्लर, स्पा, हेअर सलून आदी दुकानं सोमवार ते शुक्रवार रात्री 8 पर्यंत खुली राहतील. 50 टक्के आसान क्षमतेने तसंच रविवारी पूर्ण बंद राहतील. तर शनिवारी दुपारी 3 पर्यत खुली राहतील - जिमनॅशिअम, योगा क्लासेसदेखील वरील प्रमाणे खुली असतील - सिनेमागृह, मस्टिप्लेक्स मात्र अद्याप बंदच राहतील. - हाॅटेल्स दुपारी 4 पर्यंत 50 टक्क्यांनी खुली राहतील. विकेंडला मात्र बंद असून केवळ पार्सल सेवा सुरू राहतील. - लोकल याबाबत कोणताच उलेलख नसल्याने लोकल सेवा बंद राहतील असं समोर आलं आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published: