Corona फोफावतोय! देशातील 3000 पेक्षा जास्त स्मारकं आणि संग्रहालयांना 15 मे पर्यंत टाळं

Corona फोफावतोय! देशातील 3000 पेक्षा जास्त स्मारकं आणि संग्रहालयांना 15 मे पर्यंत टाळं

देशातील कोरोना बाधितांची (Corona Virus) संख्या दिवसेंदिवस उच्चांकी आकडा गाठत आहे. संसर्ग वेगाने वाढत असल्याने केंद्रांतर्गत आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (Archaeological Survey of India ) संस्थेअंतर्गत येणारी संरक्षित स्मारकं, संग्रहालयं 15 मेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत

  • Share this:

नवी दिल्ली, 16 एप्रिल: देशातील कोरोना बाधितांची (Coronavirus) संख्या दिवसेंदिवस उच्चांकी आकडा गाठत आहे. संसर्ग वेगाने वाढत असल्याने केंद्रांतर्गत आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (Archaeological Survey of India ) संस्थेअंतर्गत येणारी संरक्षित स्मारकं, संग्रहालयं 15 मेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत, अशी माहिती केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने (Cultural Ministry) गुरुवारी दिली आहे. तसेच लाल किल्ला (Red Fort) आणि कुतुबमिनार देखील (Qutub Minar) 15मे पर्यंत बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद पटेल (Culture Minister Prahlad Patel) आणि एएसआयने यासंबंधित अधिकृत पत्रक ट्वीट केलं आहे.

'सध्याची कोरोनाची परिस्थिती बघता भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागांतर्गत येणारी सर्व स्मारकं, वारसास्थळं आणि संग्रहालयं (museums) 15 मे पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे', असं या पत्रकात म्हटले आहे. यामध्ये 3,693 स्मारकं आणि 50 संग्रहालयांचा समावेश आहे. तसेच पुरीचं जगन्नाथ मंदिर (Puri Jagannath Temple) आणि सोमनाथ मंदिरांमध्ये (Somnath Temple) दररोज पूजा केली जाईल मात्र तिथे भाविकांना येण्यास परवानगी नसेल. मंदिरातील मोजक्याच पुजाऱ्यांच्या उपस्थितीत विधी पार पडतील, असे मंत्रालयाचे माध्यम सल्लागार नितीन त्रिपाठी यांनी सांगितले.

(हे वाचा-राज्यात Remdesivir कधीपर्यंत होणार उपलब्ध? बैठकीनंतर मंत्र्यांनी दिलं उत्तर)

गेल्यावर्षीही एएसआयने सर्व स्मारकं आणि संग्रहालयं 17 मार्चपासून बंद केली होती. मास्क घालणं, सुरक्षित अंतर राखणं या निर्बंधांसह जुलै महिन्यात ही स्मारकं आणि संग्रहालयं पुन्हा उघडण्यात आली होती. सध्या कोरोनामुळे अनेक जण घरी आहेत. शाळा-कॉलेजांना सुट्या आहेत आणि लॉकडाउन नाही त्यामुळे अनेकजण फिरायला निघत आहेत. अशी मंडळी नक्कीच या ठिकाणांना भेट देण्याची शक्यता आहे त्यामुळे सरकारने आधीच खबरदारी करून ही स्थळं बंद केली आहेत.

2020 वर्षाच्या शेवटी कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने अनेक निर्बंध शिथिल केलेगेले. मात्र, यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासून रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आणि रुग्णांची दैनंदिन संख्या ही दोन लाखांच्यावर गेली आहे.

(हे वाचा-कोरोना लशीसाठी पुण्याच्या पूनावालांची धडपड; अमेरिकेसमोर हात जोडत केली मोठी मागणी)

देशात गुरुवारी 15 एप्रिल रोजी 2,17,353 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. ही आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. तर, गुरुवारी 1,18,302 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून 1,185 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आलीआहे. देशातील एकूण रुग्णसंख्या 1,42,91,917 झाली आहे. तर, देशात सध्या 15लाख 69 हजार 743 सक्रिय रुग्ण असून आतापर्यंत 1,74,308 जणांचा मृत्यू झालाआहे,अशी माहिती एएनआयने दिली आहे.

First published: April 16, 2021, 4:45 PM IST

ताज्या बातम्या