राज्यात Remdesivir कधीपर्यंत होणार उपलब्ध? बैठकीनंतर मंत्र्यांनी दिलं उत्तर

राज्यात Remdesivir कधीपर्यंत होणार उपलब्ध? बैठकीनंतर मंत्र्यांनी दिलं उत्तर

दरम्यान आज राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी रेमडीसीवीरच्या तुटवड्याबाबत तातडीने बैठक बोलावली होती.

  • Share this:

मुंबई, 16 एप्रिल: राज्यात रेमडीसीवीर (Remdesivir) इंजेक्शनचा तुटवडा असल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. राज्यात रेमडीसीवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे राज्य सरकारने इंजेक्शन खरेदीसाठी प्रयत्न सुरू केले आहे. पण पुरवठादारांनी इंजेक्शन देण्यास नकार दिला आहे. राज्य सरकारला 654 रुपये दराने रेमडेसीवीर इंजेक्शन हवे आहे. पण खुल्या बाजारात बाराशे रुपये किंमत असताना कंपनी सरकारला रेमडीसीवीर द्यायला इच्छुक नाहीत, असे वृत्त काल समोर आले होते.

दरम्यान आज राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी रेमडीसीवीरच्या तुटवड्याबाबत तातडीने बैठक बोलावली होती. यावेळी एफडीएचे अधिकारीही बैठकीला उपस्थित होते.

यावेळी डॉ. शिंगणे म्हणाले की, आजही राज्यात रेमडीसीवीरचा तुटवडा आहे. अॅक्टीव केसेस 6 लाख 20 हजार आहेत. जवळपास दररोज आपल्याला 12-15 हजार इंजेक्शन्सचा तुटवडा आहे. पुढील दोन ते चार दिवस तरी हीच स्थिती राहील, असं चित्र आहे. काही कंपन्यांच्या सीईओ आणि एमडींशी व्हीसीद्वारे चर्चा झाली होती. काही दिवसांपूर्वीच चर्चा झाली त्यानुसार दिवसाला 55 हजारांचा पुरवठा होत नसल्याचं दिसत आहे. निर्यात बंदी झाल्याने देशात रेमडीसीवीरचा साठा उपलब्ध असेल. काल सीएमच्या आदेशानुसार निर्यात बंदीचा साठा राज्यात मिळू शकेल असा निर्णय झाला आहे. राज्यात जास्तीत जास्त साठा मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असंही ते यावेळी म्हणाले. कंपन्यांचा इंजेक्शनच्या दरासंदर्भात काही गैरसमज झाला आहे. रेमडेसेवीरची उपलब्ध कमी आहे, काही कंपन्यांनी महाराष्ट्रात एकही इंजेक्शन्स पुरवलेले नाही, असेही शिंगणे यावेळी म्हणाले.

हे ही वाचा-Remdesivir Injection बाबत मोठी बातमी; कोविड-19 टास्क फोर्सकडून रुग्णांना दिलासा

ते पुढे म्हणाले की, सरकारी रुग्णालयात रेमडीसीवीरची सुदैवाने कमतरता नाही. पण खाजगी रुग्णालयात तुटवडा जाणवत आहे. पुण्यात तुटवडा जाणवतोय तो दूर करण्यासाठी मी आयुक्तांना सूचना करेन. दुसरीकडे हाफकीनच्या माध्यमातून चांगलं काम होतआहे. 150 कोटी खर्च करुन या लसीला आपण सुरुवात करणार आहोत. प्राथमिक खर्चासाठी पुढील मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात येईल, असाही दुजोरा त्यांनी यावेळी दिला.

Published by: Meenal Gangurde
First published: April 16, 2021, 3:53 PM IST

ताज्या बातम्या