पुणे, 16 एप्रिल : एकिकडे देशात कोरोना (Coronavirus in India) रुग्णसंख्या वाढते आहे. तर दुसरीकडे आता आरोग्य व्यवस्था अपुरी पडू लागली. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी वापरण्यात येणारं रेमडेसिवीर औषध, ऑक्सिजन आणि कोरोना लशीचाही (Corona vaccine) तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे आता देशासमोर सर्वात मोठं आव्हान आहे. हा सर्व तुटवडा (Covid 19 vaccine) दूर व्हावा यासाठी केंद्र आणि राज्य सरकार आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. त्यात आता पुण्यातील लस उत्पादक कंपनी सीरम इन्स्टिट्यूचे (Pune Serum institute of india) सीईओ आदर पूनावाला (Adar poonawalla) यांनीसुद्धा धडपड सुरू केली आहे. त्यांनी अमेरिकेसमोर हात जोडत आता मोठी मागणी केली आहे. ऑक्सफोर्ड आणि अॅस्ट्राझेनेकाच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या कोरोना लशीचं उत्पादन भारतात पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट मार्फत केलं जातं. भारतात ही लस कोविशिल्ड म्हणून ओळखली जाते. काही दिवसांपासून देशात कोरोना लशीचा तुटवडा निर्माण झाला आहे.
Respected @POTUS, if we are to truly unite in beating this virus, on behalf of the vaccine industry outside the U.S., I humbly request you to lift the embargo of raw material exports out of the U.S. so that vaccine production can ramp up. Your administration has the details. 🙏🙏
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) April 16, 2021
अमेरिकेमुळे भारतातील लस उत्पादनावर परिणाम होत आहे, असं पूनावाला यांनी याआधी सांगितलं होतं. अमेरिकेने कच्च्या मालाच्या निर्यातीवर निर्बंध लावले आहेत. त्यामुळे लशीच्या उत्पादनावर परिणाम झाल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान आता हे निर्यात उठवावेत अशी मागणी त्यांनी अमेरिकेकडे केली आहे. हे वाचा - राज्यात Remdesivir कधीपर्यंत होणार उपलब्ध? बैठकीनंतर मंत्र्यांनी दिलं उत्तर आदर पूनावाला यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना उद्देशून एक ट्वीट केलं आहे. त्यात ते म्हणाले, “जर आपण खरंच कोरोनाव्हायरसविरोधातील लढाई एकत्र लढत आहोत. तर अमेरिकेबाहेर कोरोना लशीचं उत्पादन करत असल्याने मी तुम्हाला विनंती करतो ही अमेरिकेने कच्च्या मालाच्या निर्यातीवर लावण्यात आलेले निर्बंध हटवावेत. जेणेकरून लशीचं उत्पादन वाढवता येईल. असं म्हणत पूनावाला यांनी हातही जोडले आहेत” हे वाचा - Corona संकटात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 50 हजार मेट्रिक टन वैद्यकीय Oxygen आयात देशातील कोरोनाचं भयंकर रूप पाहता देशात अनेक राज्यांनी संचारबंदी, लॉकडाऊन असे कठोर निर्बंध लागू केले आहेत. शिवाय जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करण्याचा प्रयत्न आहे. देशात सध्या कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन लशी दिल्या जात आहेत. तिसरी लस रशियाच्या स्पुतनिक V च्या आपात्कालीन वापरालासुद्धा मंजुरी दिली आहे. येत्या काही दिवसांत आणखी विदेशी लशींना परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे. या लशींना परवानगी देण्याची प्रक्रियाही जलद करण्यात आली आहे.