मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /पुणे, नाशिक आणि नागपूरमध्ये कोरोनाचं संकट गडद! 11 मे दरम्यान अशाप्रकारे बिकट होणार परिस्थिती

पुणे, नाशिक आणि नागपूरमध्ये कोरोनाचं संकट गडद! 11 मे दरम्यान अशाप्रकारे बिकट होणार परिस्थिती

Corona काळात जास्त वेळ पुरेल ऑक्सिजन सिलेंडर

Corona काळात जास्त वेळ पुरेल ऑक्सिजन सिलेंडर

11 मे पर्यंत पुणे, नागपूर आणि नाशिक (Pune, Nagpur, Nashik) या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे सर्वांत जास्त अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active Corona Patients) असतील, असा अंदाज एका नव्या विश्लेषणातून समोर आला आहे.

    मुंबई, 29 एप्रिल: कोरोना संसर्गाची (Corona Second Wave) महाराष्ट्रातील स्थिती दिवसेंदिवसअधिकाधिक गंभीर रूप धारण करत आहे. त्यामुळे आकडेवारीचा अभ्यास करून, त्यातले प्रवाह लक्षात घेऊन आगामी काळातल्या संसर्गाच्या प्रमाणाचा अंदाज बांधला जात आहे. 11 मे पर्यंत पुणे, नागपूर आणि नाशिक (Pune, Nagpur, Nashik) या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे सर्वांत जास्त अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active Corona Patients) असतील, असा अंदाज एका नव्या विश्लेषणातून समोर आला आहे. चिंतेची बाब म्हणजे त्या काळात या तीन जिल्ह्यांत ऑक्सिजन बेड्सचा देखील तीव्र तुटवडा भासू शकतो,असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दी इंडियन एक्स्प्रेसने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

    राज्यातल्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बुधवारी (28एप्रिल) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विश्लेषणाची दखल घेण्यात आली. ही बाब लक्षात घेता राज्यात लॉकडाऊन देखील 15 मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोव्हि-19 संसर्गाचा वेग कमी करण्याचा तो महत्त्वाचा उपाय आहे, अशीशिफारस कोव्हिड टास्क फोर्सने (Covid Task Force) एकमताने केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

    कोव्हिड-19 बद्दलचे राज्याचे तांत्रिक सल्लागार आणि राज्याच्या कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ.सुभाष साळुंखे यांनी याबद्दलची माहिती दिली. 'पुढचे दोन-तीन महिने तरी सार्वजनिक कार्यक्रम आणि लोकांनी मोठ्या प्रमाणावर एकत्र येण्यावर बंदी असली पाहिजे. भाजीपाला बाजारपेठेतही मोठ्या गर्दीला परवानगी देता कामा नये. डॉक्टर्सची क्षमता संपली आहे. त्यांना आणखी ताणता येणार नाही,' असं डॉ.साळुंखे म्हणाले.

    (हे वाचा-Oxygen Crisis: टाटांनी पुन्हा वाढवला ऑक्सिजनच पुरवठा,600 टन ऐवजी पुरवणार 800 टन)

    पुण्यात काय असू शकते परिस्थिती?

    नव्या विश्लेषणानुसार असा अंदाज आहे की, पुणे जिल्ह्यात 11मेपर्यंत अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 1,20,376 पर्यंत पोहोचेल. ही संख्या लक्षात घेतली, तर 4097 ऑक्सिजन बेड्स, 26,345 आयसोलेशन बेड्स (Isolation Beds), 103 आयसीयूबेड्स (ICU Beds) आणि 227 व्हेंटिलेटर्सची (Ventilators) कमतरता भासू शकते, असा अंदाज अधिकाऱ्यांनी बांधला आहे. 27 एप्रिलपर्यंतच्या आकडेवारीनुसार पुणे जिल्ह्यात 1.04 लाख अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

    नागपूरची आकडेवारी

    नागपूर जिल्ह्यात 11 मेपर्यंत अ‍ॅक्टिव्ह कोरोना बाधितांची संख्या 1,13,093 पर्यंत जाण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे 43,583 आयसोलेशन बेड्स, 8679 ऑक्सिजन बेड्स, 1247 आयसीयू बेड्स आणि 455 व्हेंटिलेटर्सची कमतरता भासण्याचा अंदाज आहे. सध्या नागपुरात 75,219 अ‍ॅक्टिव्ह कोरोनाबाधित आहेत.

    (हे वाचा-गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही चारधाम यात्रा रद्द, कोरोना संक्रमण रोखण्यासाठी निर्णय)

    नाशिकमध्येही परिस्थिती भीषण

    नाशिक जिल्ह्यात 11 मेपर्यंत 95,916 अ‍ॅक्टिव्ह कोरोनाबाधित आढळण्याची शक्यता आहे. त्यामुळे 38,615 आयसोलेशन बेड्स, 6253 ऑक्सिजन बेड्स, 1535 आयसीयू बेड्स आणि 27व्हेंटिलेटर्सची उणीव भासेल, असा अंदाज आहे. 27 एप्रिल पर्यंतच्या स्थितीनुसार नाशकात 51,061 अ‍ॅक्टिव्ह कोरोनाबाधित आहेत.

    मुंबईतही अद्याप पूर्णपणे परिस्थिती सुधारली नाही आहे पण..

    मुंबईत सध्या 68,603 अ‍ॅक्टिव्ह कोरोनाबाधित असून, 11 मेपर्यंत ही संख्या 64,507पर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे. तोपर्यंत मुंबईत 4200 ऑक्सिजन बेड्स, 1129 आयसीयू बेड्स आणि 923 व्हेंटिलेटर्स उपलब्ध असतील, त्यामुळे कमतरता भासणार नाही, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, सोलापूर, अमरावती, नांदेड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांत मृत्युदर (Fatality Rate) अधिक आहे.

    26 एप्रिल पर्यंत राज्यभरात 6.74 लाख अ‍ॅक्टिव्ह कोरोनाबाधित होते. त्यापैकी 10.33 टक्के म्हणजे 69,705 रुग्णांची स्थिती गंभीर होती. एकंदर, 22 हजार 387 रुग्णांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं. त्यापैकी 6248 रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं, तर 16,139 जणांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आलं होतं.

    First published:

    Tags: Corona, Coronavirus, Covid-19, Maharashtra, Nagpur, Nashik, Pune, Shortage of beds