जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / कोरोनावर 94.5 % प्रभावी Vaccine ची किंमत तापाच्या औषधापेक्षाही कमी, मोजावी लागणार इतकी रक्कम

कोरोनावर 94.5 % प्रभावी Vaccine ची किंमत तापाच्या औषधापेक्षाही कमी, मोजावी लागणार इतकी रक्कम

कोरोनावर 94.5 % प्रभावी Vaccine ची किंमत तापाच्या औषधापेक्षाही कमी, मोजावी लागणार इतकी रक्कम

याआधी मॉर्डनानं जाहीर केली आहे की, त्यांनी तयार केलेली लस 94.5 टक्केपर्यंत प्रभावी आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर : कोरोनाव्हायरसला (Coronavirus) 94.5 टक्के नष्ट करण्याचा दावा करणारी मॉर्डना लस (Moderna Covid 19 vaccine) लवकरच डोस उपलब्ध करणार आहे. मात्र या लशीसाठी सरकारला प्रति डोस 25 डॉलर (1854 रुपये) ते 37 डॉलर (2744 रुपये) दरम्यान किंमत मोजावी लागणा आहे. कोरोना लसीकरणासाठीही भारतही मॉडर्नाच्या संपर्कात आहे. यासंदर्भात, मॉडर्ना कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीफन बॅन्सेल यांनी एका जर्मन वृत्तपत्राला सांगितले की या लसीची किंमत देखील त्याच्या ऑर्डरच्या प्रमाणात अवलंबून असेल. स्टीफन यांनी सांगितले की, मॉडर्नाने तयार केलेल्या लशीची किंमत साधारण फ्लूच्या लशीएवढी आहे. युरोपियन संघ मोडेर्ना लस 25 डॉलरपेक्षा कमी किंमतीने लस घेण्याबाबत चर्चा करीत आहे. बॅन्सेल यांनी सांगितले की, अद्याप कोणताही करार झाला नाही मात्र आम्ही लस तयार करण्याच्या अगदी जवळ आहोत. दरम्यान, याआधी मॉर्डनानं जाहीर केली आहे की, त्यांनी तयार केलेली लस 94.5 टक्केपर्यंत प्रभावी आहे. वाचा- राज्यात Corona चे Active रुग्ण वाढले; 25 दिवसांनी नव्या रुग्णांची संख्या वाढली मॅसाच्युसेट्सच्या केंब्रिज मॉर्डनाची घोषणा फेझर आणि बायोन्टेक यांच्या घोषणेनंतर सुमारे आठवडाभरानंतर केली. संभाव्य लस चाचणी दरम्यान 90 टक्क्यांपर्यंत प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. तिसर्‍या टप्प्यात एमआरएनए -1273 (लसीचे नाव) चाचणीत, स्वतंत्र, एनआयएच नियुक्त डेटा सेफ्टी मॉनिटरिंग बोर्डने (डीएसएमबी) कंपनीला संभाव्य लसीचा परिणाम असल्याची माहिती दिली आहे. अभ्यासाने निर्धारित पात्रता पूर्ण केली असून ही लस 94.4 टक्के प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. वाचा- कोरोनामुक्त रुग्णांना दिलासा! किमान 6 महिने तरी कोरोना उलटण्याचा धोका नाही भारताने ऑर्डर केले कोरोना लशीचे 150 कोटी डोस भारतासह जगभरात कोरोना लशीच्या (Corona Vaccine) चाचण्या सुरू आहेत. अनेक देशांमध्ये कोरोना लस निर्मितीच्या शेवटच्या टप्प्यात आहे. मॉडर्ना (Moderna) आणि फायझर (Pfizer Vaccine) कंपन्यांनी आपल्या लशीच्या चाचण्या (Clinical human trials) पूर्ण झाल्याचा दावादेखील केला. आता Covid Vaccine च्या खरेदीसाठी देशा-देशांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. भारतात यापैकी किती लशी पोहोचणार आणि कधी हा खरा प्रश्न आहे. लशीसंदर्भात चांगली बातमी अशी की भारताने अगोदरच 150 कोटींहून अधिक लशींचे डोस मिळावेत म्हणून अॅडव्हान्स बुकिंग करत नंबर लावलेला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात