वॉशिंग्टन, 27 ऑगस्ट : चीन आणि रशियानं कोरोनाची लस (corona vaccine) मिळाल्याचा दावा केला असला तरी, या लशीबाबत अजूनही संभ्रम आहे. यातच अमेरिकेच्या मॉडर्ना (moderna corona vaccine) कंपनीनं तयार केलेल्या कोरोना व्हायरस लशीबाबत एक चांगली बातमी समोर आली आहे. कंपनीने सांगितले की सुरुवातीच्या ट्रायलमध्ये असे दिसून आले आहे की, ही वॅक्सिन वयस्कर रुग्णांमध्येही इम्यून (रोगप्रतिकारशक्ती) रिस्पॉन्स निर्माण करते.
मॉडर्ना कंपनीने बुधवारी सांगितले की, 56 ते 70 वर्षांचे 10 रुग्ण आहे 71हून अधिक वय असलेल्या 10 रुग्णांवर ही चाचणी करण्यात आली. सर्व व्हॉलेटियर्सना 28 दिवसांच्या फरकानं 100mgचे दोन डोस दिले.
वाचा-कोरोना होऊ गेल्यावर पुन्हा संसर्ग धोका, 4 महिन्यांनंतर महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह
कंपनीने सांगितले की, व्हॉलेंटियर्समध्ये न्यूट्रलायजिंग अॅंटिबॉडीज सापडल्या. तज्ज्ञांच्या मते, कोरोना व्हायरसच्या इम्यूनिटीसाठी अॅंटिबॉडीज महत्त्वाच्या आहेत. कंपनीने असेही सांगितले की, व्हॉलेंटियर्समध्ये मिळालेल्या अॅंटिबॉडीज या निरोगी झालेल्या रुग्णांपेक्षा अधिक होत्या.
मॉडर्ना कंपनीच्या मते, ट्रायलदरम्यान कोणत्याही रुग्णांवर साइड इफेक्ट झालेले दिसून आले नाहीत. काही रुग्णांमध्ये डोकेदुखी, थकवा अशी तक्रारी होत्या मात्र हे साइड इफेक्टही दोन दिवसांनंतर दिसले नाही.
वाचा-...म्हणून देशात वेगानं होतोय कोरोनाचा प्रसार; आताच व्हा सावध! ICMR ने दिला इशारा
अमेरिकेत एकाच वेळी अनेक लशींवर काम केले जात आहे. यातच मॉडर्ना लस सर्वात उत्तर लस असल्याचे मानले जात आहे. मॉडर्ना लशीचे फेज 3 ट्रायल सुरू झाले असून जागतिक आरोग्य संस्थेच्या मते जगभरातील एकूण 170 लशींवर सध्या काम सुरू आहे.
भारतात कधी येणार कोरोना लस?
लवकरात लवकर कोरोना लस (Corona Vaccine) मिळण्याची प्रतीक्षा प्रत्येकाला आहे. यासाठी भारत सरकारही प्रयत्नशील आहे. भारतात सध्या तीन कोरोना लशींचं ट्रायल सुरू आहे. दरम्यान आता रशियाच्या लशीसाठीदेखील भारत प्रयत्नशील आहे. रशिया आणि भारतामध्ये कोरोना लशीबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती आयसीएमआरने (ICMR) दिली आहे. या लशीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्हं उपस्थित होत असल्याने भारत जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona vaccine