मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /कोरोना होऊ गेल्यानंतर पुन्हा संसर्ग धोका, 4 महिन्यांनंतर महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

कोरोना होऊ गेल्यानंतर पुन्हा संसर्ग धोका, 4 महिन्यांनंतर महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांमध्ये देशातल्या कोरोनाबाधितांच्या संख्येपैकी 60 टक्के पेशंट आहेत.

महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांमध्ये देशातल्या कोरोनाबाधितांच्या संख्येपैकी 60 टक्के पेशंट आहेत.

एकदा कोरोना होऊन गेल्यानंतर पुन्हा 4 महिन्यांनी कोणतीही लक्षण नसतानाही रॅपिड टेस्टमध्ये रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ उडाली आहे.

अहमदाबाद, 27 ऑगस्ट : जगभरात कोरोनाचा विस्फोट होत आहे. सर्वात चिंतेची बाब म्हणजे रिकव्हरी रेट वाढलेल्या देशात आता कोरोनानं आणखी एक वेगळं रुप घेतलं आहे. एकदा संसर्ग होऊन गेल्यानंतर पुन्हा संसर्गाचा धोका त्या व्यक्तीला होऊ शकतो की नाही याबाबत सध्या अनेक निरीक्षणं सुरू आहेत. गुजरातमधील अहमदाबाद इथे 54 वर्षीय महिलेला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

23 ऑगस्टला घेण्यात आलेल्या स्वॅबमध्ये या महिलेचा दुसऱ्यांदा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. हाँगकाँग, नेदरलँड आणि बेल्झियम नंतर आता भारताचाही नंबर लागला आहे. कोरोनाचा संसर्ग होऊन गेल्यानंतर काही दिवसांनी अथवा महिन्यांनी पुन्हा संसर्ग होऊ शकतो अशी घटना समोर आली आहे. याचं प्रमाण आता कमी असलं तरीही याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

हे वाचा-लस दिल्यानंतरही पुन्हा होऊ शकतो कोरोना? 'त्या' 2 रुग्णांनी वाढवली चिंता

अहमदाबाद इथल्या इसानपूर भागातील एप्रिल महिन्यात कोरोनाचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. 4 महिन्यांनंतर पुन्हा या महिलेची चाचणी घेतल्यानंतर मात्र रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. रतन रुग्णालयात या महिलेवर सध्या उपचार सुरू आहेत. 20 ऑगस्ट रोजी झालेल्या रॅपिड टेस्टमध्ये ही महिला संक्रमित असल्याचं आढळल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

महिलेचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह असले तरी तिच्यामध्ये तशी कोणतीही लक्षणं आढळली नाहीत. आमच्या पाहण्यातली ही पहिला घटना आहे. सध्या या महिलेची प्रकृती स्थिर आहे. या महिलेवर रतन रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टर धवल पनखानिया यांनी दिली आहे.

First published:
top videos

    Tags: Coronavirus, Coronavirus symptoms