Home /News /coronavirus-latest-news /

Moderna Corona Vaccine : मॉडर्ना कंपनीच्या लशीमागे पुण्यातील मराठी शास्त्रज्ञाची मेहनत

Moderna Corona Vaccine : मॉडर्ना कंपनीच्या लशीमागे पुण्यातील मराठी शास्त्रज्ञाची मेहनत

मेतकर यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Mihir Metkar Pune university) इन्स्टिट्यूट ऑफ बायोइन्फॉर्मेटिक्स अँड बायोटेक्नॉलॉजीमधून मास्टर्स पदवी घेतली आहे.

    नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर : कोरोना महामारी सुरू झाल्यापासूनच जगभरातले वैज्ञानिक त्यावर लस तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरोना प्रतिबंधक लस बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये मॉडर्ना कंपनीचाही (Moderna corona vaccine) समावेश आहे. सध्या मॉडर्नाची कोरोना प्रतिबंधक लस जगभरातल्या कित्येक नागरिकांना देण्यात येत आहे. विशेष म्हणजे, ही लस विदेशी कंपनी तयार करत असली, तरी त्यामागे एका मराठी शास्त्रज्ञाची (Indian Scientist in Moderna) मेहनत आहे. या वैज्ञानिकाचं नाव आहे मिहिर मेतकर. पुण्यातून शिक्षण घेतलेल्या मिहिर यांचा (Mihir Metkar Moderna) उल्लेख कंपनीने आपल्या लशीच्या पेटंटच्या क्रेडिट्समध्ये (Moderna Patent credits) केला आहे. यामध्ये ‘फर्स्ट नेम्ड इन्व्हेंटर’ (Moderna first named inventor) म्हणजेच, मूलभूत योगदान असलेला शास्त्रज्ञ म्हणून मिहिर यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. मॉडर्नाची कोरोना प्रतिबंधक लस वेगळ्या प्रकारची आहे. ती मेसेंजर आरएनएचा (Messenger RNA) उपयोग करते. हाच मेसेंजर आरएनए आपल्या शरीराला कोविड-19 विषाणूसारखं प्रोटीन (Covid-19 protine) बनवण्यासाठी प्रवृत्त करतो. यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती चांगली होते आणि आपल्या शरीरात कोरोनाच्या विषाणूशी लढण्यासाठी अँटीबॉडीज (Corona antibodies) तयार होतात. इतर प्रकारच्या लशींमध्ये मेसेंजर आरएनएऐवजी मृत विषाणूचा किंवा विषाणूच्या काही मॉडिफाइड जीन्सचा वापर करण्यात येतो. अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या दाव्याविरुद्ध मॉडर्नाने दाखल केलेल्या दस्तऐवजात फर्स्ट नेम्ड इन्व्हेंटर म्हणून मिहिर मेतकर (Mihir Metkar) यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. यात त्यांनी सांगितलं आहे, की शास्त्रज्ञांनाही लशीचे संशोधक म्हणून श्रेय दिलं गेलं पाहिजे, जे सहकार्याने विकसित केलं गेलं. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने सुरू केलेल्या अभियानांतर्गत लशीचे तातडीने उत्पादन करण्यासाठी 1.53 अब्ज डॉलर्सचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. या पेटंटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, मेतकर यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Mihir Metkar Pune university) इन्स्टिट्यूट ऑफ बायोइन्फॉर्मेटिक्स अँड बायोटेक्नॉलॉजीमधून मास्टर्स पदवी घेतली आहे. अमेरिकेला जाण्यापूर्वी त्यांनी 'आयआयएसआयआर'मध्ये (IISIR) प्रकल्प सहायक म्हणून काम केलं होतं. त्यानंतर त्यांनी वर्सेस्टरमध्ये असणाऱ्या मॅसाच्युसेट्स मेडिकल स्कूलच्या आरएनए थेरेप्युटिक्स इन्स्टिट्यूटमधून पीएचडी केली. त्यानंतर काही काळ पोस्ट डॉक्टरल फेलो म्हणून काम केल्यानंतर 2018 मध्ये ते मॉडर्नामध्ये रुजू झाले. हे ही वाचा-कोरोना परत आला; 24 तासात या देशात सापडले तब्बल 37,120 नवीन रुग्ण! कंपनीने जारी केलेल्या पेटंटच्या मूळ आवेदनात मिहिर यांच्यासोबत व्लादिमीर प्रेस्नायक आणि गिलाउम स्टीवर्ट-जोन्स यांची नावं आहेत. दुसऱ्या एका पेटंटमध्ये मॉडर्नाने बीटाकोरोना विषाणूवरच्या लशीच्या दोन संशोधकांची नावं दिली आहेत. त्यात भारतीय वंशाच्या डॉ. सनी हिमांशु यांच्या नावाचा उल्लेख आहे. सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने दिलेल्या माहितीनुसार, मॉडर्ना लशीचे आतापर्यंत 164 दशलक्ष डोस देण्यात आले आहेत. तसंच, जगभरातही लाखो जणांना ही लस देण्यात आली आहे.
    First published:

    Tags: Corona spread, Corona vaccine, Pune

    पुढील बातम्या