मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

कोरोना परत आला; 24 तासात या देशात सापडले तब्बल 37,120 नवीन रुग्ण!

कोरोना परत आला; 24 तासात या देशात सापडले तब्बल 37,120 नवीन रुग्ण!

 साप्ताहिक अहवालात असे म्हटले आहे की, ज्यांनी लसीकरण केलेले नाही आणि ज्यांना लसीचा एकच डोस मिळाला आहे, त्यांना संसर्गाचा सर्वाधिक धोका आहे. पूर्णपणे लसीकरण झालेल्या लोकांना मध्यम धोका असतो.

साप्ताहिक अहवालात असे म्हटले आहे की, ज्यांनी लसीकरण केलेले नाही आणि ज्यांना लसीचा एकच डोस मिळाला आहे, त्यांना संसर्गाचा सर्वाधिक धोका आहे. पूर्णपणे लसीकरण झालेल्या लोकांना मध्यम धोका असतो.

साप्ताहिक अहवालात असे म्हटले आहे की, ज्यांनी लसीकरण केलेले नाही आणि ज्यांना लसीचा एकच डोस मिळाला आहे, त्यांना संसर्गाचा सर्वाधिक धोका आहे. पूर्णपणे लसीकरण झालेल्या लोकांना मध्यम धोका असतो.

  • Published by:  News18 Desk

बर्लिन, 05 नोव्हेंबर : आज शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी जर्मनीमध्ये कोरोना विषाणू (Corona virus) संसर्गाची विक्रमी नवीन प्रकरणे नोंदवली गेली. रॉबर्ट कोच इन्स्टिट्यूट, जर्मनीच्या रोग नियंत्रण केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात देशात कोरोना विषाणू संसर्गाची 37,120 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत, तर 154 रुग्णांचा मृत्यू झाला. रॉबर्ट कोच इन्स्टिट्यूटने सांगितले की, संसर्गाच्या या लाटेत ज्या लोकांनी अँटी-कोरोना लसीचा (Corona Vaccine) डोस घेतलेला नाही त्यांना सर्वाधिक धोका असतो. यापूर्वी गुरुवारी, जर्मनीमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची विक्रमी 33,949 नवीन प्रकरणे नोंदवली गेली. विशेष म्हणजे युरोपातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणू रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत आहेत.

जर्मनीमध्ये या महामारीमुळे आतापर्यंत 96,346 लोकांचा मृत्यू झाला आहे. रॉबर्ट कोच इन्स्टिट्यूटने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या आपल्या साप्ताहिक अहवालात असे म्हटले आहे की, ज्यांनी लसीकरण केलेले नाही आणि ज्यांना लसीचा एकच डोस मिळाला आहे, त्यांना संसर्गाचा सर्वाधिक धोका आहे. पूर्णपणे लसीकरण झालेल्या लोकांना मध्यम धोका असतो. जर्मनीच्या आरोग्यमंत्र्यांनी देशातील लोकांना कोविड-19 विरूद्ध अधिक प्रतिकारशक्ती देण्यासाठी बूस्टर डोससह लसीकरण मोहीम अधिक तीव्र करण्याचे आवाहन केलं आहे. याशिवाय देशात तपासण्यांची संख्या वाढवण्यावरही त्यांनी भर दिला आहे.

हे वाचा - जम्मू-काश्मीरमधल्या तरुणांना दहशतवाद नको; मुख्य प्रवाहात व्हायचंय सामील – जितेंद्र सिंह

जर्मनीतील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लोकांना लवकरात लवकर लसीकरण करण्याचे आवाहन केलं आहे. ज्या भागात लसीकरणाचे प्रमाण कमी आहे तेथे संसर्गाचे प्रमाण जास्त आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, जर्मनीच्या 83 दशलक्ष लोकसंख्येपैकी दोन तृतीयांश पात्र लोकांना कोविड लसीकरण मिळाले आहे. रॉबर्ट कोच इन्स्टिट्यूटने दिलेल्या माहितीनुसार मागील रेकॉर्ड 18 डिसेंबर 2020 रोजी 33,777 नवीन रुग्ण इतका होता.

हे वाचा - इकडे माशा, तिकडे मासे! मधमाशांपासून वाचण्यासाठी पाण्यात उडी, माशांच्या हल्ल्यात मृत्यू

वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर, आरोग्य मंत्री जेन्स स्पॅन आणि 16 राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांनी हिवाळ्यात कोरोना विषाणूचा प्रसार कसा मर्यादित करायचा यावर चर्चा केली. कारण हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभाग पुन्हा भरू लागले आहेत. यासोबतच मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहेत. आरकेआयने गुरुवारी 165 मृत्यूची नोंद केली, ही संख्या एका आठवड्यापूर्वी 126 होती. वरिष्ठ आरोग्य अधिकार्‍यांनी जर्मन रहिवाशांना वारंवार आवाहन केलं आहे की, ज्यांनी अद्याप लसीकरण झालेले नाही त्यांनी त्वरित लसीकरण करून घ्यावे.

First published:

Tags: Corona, Corona vaccination, Corona vaccine, Coronavirus